Next
मिलिंद जाधव यांना ‘इंडियन आयकॉन अॅवॉर्ड’ प्रदान
BOI
Friday, April 12, 2019 | 12:09 PM
15 0 0
Share this article:



भिवंडी : अजिंक्य युवा प्रतिष्ठान आणि एस. के. बंजारा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘युवा महोत्सव २०१९’ कार्यक्रमात विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात कलाक्षेत्र विभागातून युवा कवी मिलिंद जाधव यांना ‘इंडियन आयकॉन अॅवॉर्ड २०१९’ देऊन गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम मुंबईतील परेल येथील शिरोडकर सभागृहात झाला. भिवंडी तालुक्यातील पडघा या ग्रामीण भागात राहणारे जाधव यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद माडावकर, बंजारा फाउंडेशन अध्यक्ष मनोज नायक, अखिल भारतीय परिवार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल स. भा. मडामे, रिझर्व्ह बँक अधिकारी शांताराम आग्रे, दिशा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा दिशा कलंबे, नेव्ही ऑफिसर मनोज यादव, आर्मी ऑफिसर विजय निकम, सचिव अनंत जोशी, खजिनदार मिलिंद पाटील, सिद्धेश मिरगळ यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

जाधव यांनी साठये महाविद्यालयातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदविका मिळवली असून, त्यांचा सामाजिक तसेच इतर क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध सामाजिक कार्यक्रमांतून ते आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. वेगवेगळ्या कवी संमेलनांत सहभाग होत विविध विषयांवरील प्रबोधनात्मक कविता सादर करत त्या वर्तमापत्रातूनदेखील प्रकाशित केल्या आहेत. अनेक कार्यक्रमांत सूत्रसंचालनाची धुराही ते सांभाळतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल भिवंडीतील पत्रकार संतोष चव्हाण, नितीन पंडित, साठये महाविद्यालयाचे माध्यम विभागप्रमुख प्रा. गजेंद्र देवडा, साहित्यिक विजयकुमार भोईर, साहित्यिक जगदेव भटू, ॲड.  प्रज्ञेश सोनावणे, कवी नवनाथ रणखांबे, ॲड. श्रीकृष्ण टोबरे, मास्टर राजरत्न राजगुरू, कवी दीप, नरेश जाधव, संघरत्न घनघाव, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभागाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search