Next
‘मुलांचे भावविश्व आजही समृद्धच’
मानसी मगरे
Wednesday, November 15, 2017 | 03:28 PM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटो

‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ हे वाक्य अगदी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला ऐकवत असते. ते खरेही असते. प्रत्येक पिढीगणिक, काळानुसार, सोयीनुसार कित्येक गोष्टी बदलत जातात. लहान मुलांकडे पाहिल्यावर हे लक्षात येते. बालदिनाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने पुण्यातल्या गोळवलकर गुरुजी शाळेतल्या मुलांशी संवाद साधला. त्यातून समोर आलेले चित्र आजच्या मुलांच्या बदलत्या भावविश्वाचे प्रातिनिधिक चित्र आहे, असे म्हणायला हरकत नाही.
.........................................................
शाळेतील चौथीच्या वर्गातील मुलेपुणे शहरातील टिळक रस्त्यावरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात आम्ही गेलो होतो. तेथील चौथी आणि पाचवीतील मुलांशी संवाद साधल्यावर अनेक नवीन गोष्टी उलगडल्या. या मुलांनी फावल्या वेळात वाचन करतो, टीव्ही पाहतो, तसेच नृत्य, चित्रकला, गायन यांसारख्या विविध गोष्टी करत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या मुलांनी ‘काय काय वाचता,’ या प्रश्नाचे उत्तर देताना फास्टर फेणे, चिंटू, छावा, गोष्टींची पुस्तके अशा बऱ्याच चांगल्या पुस्तकांची नावे घेतली. शिवाय, ‘मोठे होऊन काय बनायचे आहे,’ या प्रश्नावरही या चिमुकल्यांनी दिलेली उत्तरे भन्नाट होती. नेल आर्टिस्ट, सैनिक, पत्रकार, खेळाडू, डान्सर, गायक अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळाली. म्हणजेच केवळ डॉक्टर आणि इंजिनीअर या आतापर्यंतच्या सरधोपट उत्तरांच्या पुढे जाऊन आजची मुले काहीतरी वेगळा विचार करत आहेत हे यावरून दिसून आले. 

आजच्या मुलांना केवळ मोबाइल, गेम्स, टीव्ही हेच हवे असते, असे जे म्हटले जाते, ते पूर्णपणे खरे नसल्याचे लक्षात आले. विशेष लक्षात आलेली गोष्ट अशी, की वाचन, विविध क्रीडा प्रकार आणि नृत्य, गायन, वादन, चित्रकला यांसारख्या गोष्टींमधील मुलांचे ज्ञान पाहता ती केवळ मोबाइल, टीव्ही यातच अडकली आहेत, असे म्हणता येणार नाही. याव्यतिरिक्त मनोरंजनाचे आणि छंदाचे अनेक मार्ग त्यांनी स्वीकारले आहेत, असे दिसून आले. त्यामुळे त्यांचे भावविश्व बऱ्यापैकी समृद्ध आहे, असे म्हणायला वाव आहे.

अर्थात, मोबाइल गेम्स खेळायला आवडत असल्याचेही अनेक मुलांनी स्वतःहून सांगितले, ही गोष्टही अजिबात दुर्लक्षून चालणार नाही. केवळ ठरावीक मुलांशी बोलून ठोस निष्कर्ष काढता येणे शक्य नाही आणि तसा उद्देशही नव्हता; पण एकंदरीत विचार करता आजची मुले त्यांच्या वयाच्या मानाने खूप स्मार्ट आणि फास्ट आहेत, हे त्यांच्याशी बोलल्यावर प्रकर्षाने जाणवले. 

(या मुलांशी साधलेल्या संवादाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... व्हिडिओ : स्नेहा कोंडलकर)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Santosh jadhav About
Very nice job..
0
0
Ashlesha bhagwat About
भविष्या बद्दल प्रेरणादायी उत्तरे .पण मराठी शाळा असल्यामुळे ही उत्तरं मिळाली.इंग्रजी शाळांमध्ये ही उत्तरे मिळणार नाहीत.video छान.
0
0

Select Language
Share Link