Next
‘सॅप एस/फोर एचएएनए क्लाउड’ भारतात उपलब्ध
प्रेस रिलीज
Monday, May 14 | 03:01 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘सॅप एसई’ त्यांचे इंटेलिजंट क्लाउड एंटरप्राइज रिसोर्स प्लानिंग (ईआरपी) सॉफ्टवेअर-अॅज-ए-सर्व्हिस (एए) सोल्यूशन ‘सॅप एस/फोर एचएएनए क्लाउड’ आता भारतात उपलब्ध असल्याची घोषणा नुकतीच केली.

‘सॅप एस/फोर एचएएनए क्लाउड’ हे बिल्ट-इन मशिन लर्निंग व एआय क्षमता असलेले इंटेलिजंट ‘ईआरपी’ असून, सुलभ युजर अनुभवासह व्यवसायिक प्रक्रियेत सुलभता आणण्यामध्ये मदत करते. ज्यामुळे कंपन्या ‘इंटेलिजंट एंटरप्राइजेस’मध्ये बनू शकतील. या सोल्यूशमध्ये एकूण व्यवसाय क्षमता वाढवण्यासाठी रोजच्या कामांचे ऑटोमेशन व अगोदरच निर्णय घेण्याची क्षमता यांचे संयोजन आहे. सॅप एस/फोर एचएएनएसह व्यवसायांना तिमाही अपडेट्सच्या माध्यमातून आधुनिक नाविन्यतांची माहिती देण्यात येईल आणि त्यांना सूचक विश्‍लेषणासारख्या क्षेत्रांमधील आधुनिक नाविन्यतांची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.

आयटी क्षेत्रामध्ये संवादात्मक एआय व्यासपीठे हा यापुढील मोठा आमूलाग्र बदल असणार आहे. त्यामुळे ‘सॅप’ने ‘सॅप एस/फोर एचएएनए क्लाउड’सोबत सॅप कोपायलटला एकीकृत केले आहे. हे सोल्यूशन एंटरप्राइजेससाठी पहिले अस्सल वॉइस-अ‍ॅक्टिव्हेटेड डिजिटल असिस्टंट आहे. हे सोल्यूशन युजरला त्यांचे कार्य अधिक जलदपणे व कार्यक्षमपणे पूर्ण करण्यामध्ये मदत करते; तसेच व्यवसाय प्रक्रियांमध्ये टीमवर्क वाढवते. मशिन लर्निंग व एआय क्षमतांनी समर्थित सॅप कोपायलट व्यवसाय संदर्भांची माहिती देण्यासोबतच कार्यक्षम सहयोगाला चालना देते. व्यवसाय डेटा जलदपणे उपलब्ध करून देण्यासोबतच त्याच्याशी कनेक्ट करून देते आणि इन-कॉन्टेक्स्ट चॅटची सुविधा देते.

‘२०२०पर्यंत ४.१ बिलियन डॉलर्स बाजारपेठ उलाढालीसह जगातील अव्वल क्लाउड बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश होणे अपेक्षित आहे. ‘सॅप एस/फोर एचएएनए पब्लिक क्लाउडसह क्लाउडच्या माध्यमातून आमचे डिजिटल कोअर अधिक व्यापक करत ईआरपी क्षेत्रातील आमचे अग्रणीस्थान क्लाउडमध्ये देखील कायम राहण्याच्या मार्गावर आहे,’ असे सॅप भारतीय उपखंडाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक देवदीप सेनगुप्ता म्हणाले.

‘जगभरात क्लाउड प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सॅप एस/फोर एचएएनए क्लाउड अगदी सुलभपणे भारतीय एंटरप्राइजेसना डिजिटल युगात घेऊन जाईल. ‘इंटेलिजंट क्लाउड सूट मोठ्या व मध्यम भारतीय कंपन्यांना पाठबळ देत नाविन्यतेला चालना देईल. कंपन्यांना प्रक्रिया ‘ऑटोमेट’ (सुलभ) करण्यामध्ये, महत्त्वपूर्ण उपयोजनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘असिस्टन्स’ (साह्य) मिळवण्यामध्ये आणि संदर्भ-परिचित निर्णयांवर आधारित ‘अ‍ॅक्ट’ (कार्य) करण्यामध्ये सक्षम करण्याचा आमचा उद्देश आहे,’ असे सॅप ‘एस/फोर एचएएनए क्लाउड’च्या मुख्य महसूल अधिकारी मेलिसा डी डोनॅटो म्हणाल्या.

सॅप एस/फोर एचएएनए ग्राहकांना विविध उत्पादन-केंद्रित व सेवा-केंद्रित उद्योगांमध्ये प्रकल्प व्यवस्थापन, उत्पादन, विक्री ऑर्डरचे व्यवस्थापन, इन्व्हेंटरी व पुरवठा शृंखला व्यवस्थापन, आर्थिक व खरेदी यांमध्ये त्वरित मूल्य, खर्चामधील बचत व सुधारित कार्यक्षमता प्राप्त करण्यामध्ये मदत करते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link