Next
बोपोडीत खास महिलांसाठी ‘रोजा इफ्तार’
नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या पुढाकाराने आयोजन
BOI
Tuesday, May 28, 2019 | 06:10 PM
15 0 0
Share this article:


पुणे : मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी नुकतेच बोपोडीत खास महिलांसाठी रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. सर्वधर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र साजरे करून सामाजिक सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने नगरसेविका सुनीता वाडेकर व आरपीआय नेते परशुराम वाडेकर मित्र परिवाराच्या वतीने या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. जवळपास १५० महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. 

बोपोडीतील पठाण चाळीत असलेल्या शहाबुद्धीन काझी निवासात या रोजा इफ्तारचे आयोजन केले होते. खजूर, फळे, ज्यूस, अंगुरमलाई, चिकन बिर्याणी आदी रुचकर पदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. या वेळी सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, शहाबुद्दीन काझी, विजय सोनिगरा, फातिमा करीम खान, डॉ. तरन्नूम परकुटे, नजमा काझी, हिना काझी, शमीम शेख, इरफाना शेख, अरुणा सोनिगरा, नंदा निकाळजे, राजश्री कांबळे, फारूक शेख, बाबा शेख, सादिक शेख, समीर मण्यार आदी उपस्थित होते.


‘देशाला सर्व धर्म सलोख्याची गरज आहे. मुस्लिम समाजाच्या या पवित्र महिन्यात, त्यांच्या सणात आपणही सहभागी आनंद घेतला पाहिजे. या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून बोपोडी भागातील मुस्लिम भगिनींसाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते,’ असे नगरसेविका सुनीता वाडेकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search