Next
‘महिंद्रा’तर्फे ‘टीयूव्ही ३००’ सादर
प्रेस रिलीज
Friday, May 03, 2019 | 05:51 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने (एमअँडएम) त्यांच्या ‘एसयूव्ही’ला नवे रूप देत ‘टीयूव्ही३००’ सादर केली. या गाडीतील वैशिष्ट्ये सुधारण्यात आली असून, काही नवी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नवी ‘टीयूव्ही ३००’ ८.३८ लाख रुपयांत (एक्स शोरूम मुंबई) उपलब्ध करण्यात आली आहे.

‘टीयूव्ही३००’ ही अस्सल ‘एसयूव्ही’ डिझाइन असलेली कॉम्पॅक्ट ‘एसयूव्ही’ विभागातील एकमेव गाडी असून, ती आता जास्त ठळक आणि उठावदार वैशिष्ट्यासंह खरेदी करता येणार आहे. यामध्ये नवे, आक्रमक, पियानो ब्लॅक फ्रंट ग्रिल ब्लॅक क्रोमो इन्सर्टसह, दणकट साइड क्लॅडिंग आणि नव्याने तयार करण्यात आलेले एक्स आकाराचे मेटॅलिक ग्रे स्पेयर व्हील कव्हर समाविष्ट करण्यात आले आहे. डेटाइम रनिंग लॅम्प्ससह (डीआरएल) नवे हेडलॅम्प डिझाइन आणि कार्बन ब्लॅक फिनिश नव्या, बोल्ड ‘टीयूव्ही३००’ची स्टाइल आणखी उठावदार करणार आहे.


पिनिनफारिना या इटालियन डिझाइन हाउसद्वारे तयार केलेली अंतर्गत सजावट नव्या चंदेरी अक्सेंट्स आणि आलिशान लूक दर्शवणारी आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, १७.८ सेमी इन्फोटेनमेंट सिस्टीम, जीपीएससह, स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प्स आणि मायक्रो- हायब्रीड तंत्रज्ञान हे चालकाला सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अनुभव देणारी आहेत.

या विषयी बोलताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे विक्री आणि विपणन प्रमुख विजय राम नाक्रा म्हणाले, ‘नवी, बोल्ड ‘टीयूव्ही ३००’ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. अस्सल ‘एसयूव्ही’चे डिझाइन असलेल्या या कॉम्पॅक्ट ‘एसयूव्ही’मध्ये सात आसनांची जागा आणि आरामदायीपणा यांची उच्च तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्यांशी सांगड घालण्यात आली आहे. ‘टीयूव्ही ३००’ने एक लाख समाधानी ग्राहकांना सेवा देत यापूर्वीच कॉम्पॅक्ट ‘एसयूव्ही’ क्षेत्रातले आपले स्थान बळकट केले आहे. नवे जास्त उठावदार आणि दणकट डिझाइन खऱ्या ‘एसयूव्ही’च्या शोधात असलेल्या आणि स्टायलिश स्टेटमेंट करू इच्छिणाऱ्यांना ग्राहकांना आकर्षित करेल असा मला विश्वास वाटतो.’

नव्या ‘टीयूव्ही ३००’ला शक्तीशाली ‘एमएचएडब्ल्यूके’ इंजिनची जोड देण्यात आली असून, त्याची क्षमता १०० बीएचपी आणि २४० एनएम टॉर्क इतकी आहे. कुशन सस्पेंशन तंत्रज्ञान आणि ऑप्टिमाइज्ड राइड हाइटमुळे गाडी चालवण्याचा आनंद दुणावतो. त्याव्यतिरिक्त मजबूत प्रकारच्या स्टीलपासून बनवलेल्या टफ बॉडी शेलमुळे प्रवासी सुरक्षित राहातील. ‘टीयूव्ही ३००’ची चासिस महिंद्रा स्कॉर्पिओवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे.


ग्राहकांना या गाडीची सात आकर्षक रंगांमधून निवड करता येणार असून, त्यात हायवे रेड आणि मिस्टिक कॉपर या दोन नव्या रंगांचाही समावेश करण्यात आला आहे. स्टायलिश ड्युअल टोनशिवाय लाल आणि काळा/चंदेरी आणि काळा, उठावदार काळा, मॅजेस्टिक सिल्व्हर आणि पर्ल व्हाइट हे मूळ रंगही उपलब्ध आहेत. सध्याच्या व्हेरिएंटशिवाय (टीफोरप्लस, टीसिक्सप्लस, टीएट आणि टीटेन) टी१०(ओ) चा पर्यायी पॅकही उपलब्ध आहे.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search