Next
‘गोठ’च्या सेटवर झाली आंबा पार्टी
प्रेस रिलीज
Tuesday, June 05 | 11:20 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘गोठ’ या मालिकेच्या सेटवर ‘गोठ’च्या कलाकारांनी एकत्र येत नुकतीच आंबा पार्टी केली.

कामातून विरंगुळा म्हणून ‘गोठ’च्या सेटवर कलाकारांकडून नेहमीच काही ना काही गमतीजमती सुरू असतात. आंबा पार्टी हा त्याचाच एक भाग होता. सुशील इनामदार, रूपल नंद, सुरभी भावे, शलाका पवार, समीर परांजपे या कलाकारांनी दुपारच्या जेवणाबरोबरच कोकणातून आणलेले आंब्यावर मनसोक्त ताव मारत आंबा पार्टी साजरी केली.

‘सगळ्यांनी मिळून केलेली ही आंबा पार्टी फारच धमाल होती. आंब्याला नाही म्हणणे काही शक्य नसते. त्यामुळे सगळेजण त्यात सामील झाले आणि भरपूर आंबे खाल्ले. आता अशा पार्टीसाठी पुढच्या वर्षीपर्यंत वाट पहावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया सर्वच कलाकारांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link