Next
बोन्साय आर्टिस्ट प्राजक्ता काळे यांचा गौरव
प्रेस रिलीज
Thursday, May 31, 2018 | 12:18 PM
15 0 0
Share this story

प्राजक्ता काळे
पुणे : वामनवृक्ष कला अर्थात बोन्सायला एक नवी ओळख देण्यासाठी व या कलेच्या वाढीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या पुण्यातील प्राजक्ता काळे यांचा म्हैसूरच्या ‘श्री अवधूत दत्त पीठम्’ यांच्या वतीने ‘सस्यबंधु:’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

संस्थेचे प्रमुख श्री गणपति सच्चिदानंद स्वामीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त म्हैसूर येथील आश्रमात पार पडलेल्या कार्यक्रमात, प्राजक्ता काळे यांना सच्चिदानंद स्वामीजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

वामनवृक्ष कला म्हणजेच बोन्साय ही खरेतर मूळची भारतीय कला आहे, मात्र त्याचा प्रसार आणि प्रचार आपल्याकडे न होता परदेशात मोठ्या प्रमाणात झाला. ही कला भारताची आहे तिचा आपल्या देशात प्रसार व्हावा, त्यातून आजच्या पिढीबरोबरच आपल्या येणाऱ्या पिढ्यांना देखील रोजगार मिळावा आणि ही कला जास्तीत जास्त कलाप्रेमींपर्यंत पोहोचावी या दृष्टीने प्राजक्ता काळे या गेली ४० वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या याच कामाची दखल घेत, म्हैसूरच्या श्री अवधूत दत्त पीठम् यांच्याकडून काळे यांचा गौरव करण्यात आला.

या वेळी बोलताना प्राजक्ता काळे म्हणाल्या, ‘येणारा काळ हा वामनवृक्ष कलेचा काळ आहे. हे लक्षात घेऊन या कलेच्या वृद्धीसाठी खास प्रशिक्षण संस्था सुरू करून पुढील पिढीतील तरुण वर्गास त्या विषयीची माहिती देणे महत्त्वाचे आहे. यामुळे तरुणांपुढील रोजगार निर्मितीचे दालनही खुले होणार आहे. याबरोबरच भविष्यात नष्ट होणाऱ्या विविध औषधी वनस्पती या कलेच्या माध्यमातून जतन करणे शक्य होणार आहे. त्यासाठी पावले उचलली जावीत, अशी माझी इच्छा आहे.’

प्राजक्ता काळे या ‘बोन्साय नमस्ते’ या संस्थेच्या संस्थापक संचालिका असून, त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून पुण्यात ‘बोन्साय नमस्ते’ या भारतातील पहिल्या व जगातील सर्वांत मोठ्या बोन्सायच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तीन हजारांहून अधिक बोन्साय पाहण्याची संधी बोन्साय प्रेमींना मिळाली होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link