Next
सुखद मुंडे यांच्या सोलो मृदंगवादनाला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, December 31, 2018 | 05:06 PM
15 0 0
Share this article:पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत युवा कलाकार सुखद मुंडे यांच्या मृदंग सोलोवादन (एकल) कार्यक्रमाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.

हा कार्यक्रम सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहात २९ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित केला होता. मुंडे यांचे या वेळी पखवाजवादनही झाले. यात त्यांनी प्रथम १२ मात्रांचा चौताल वाजवला. मुंडे यांनी घराणेदार पखावजवादन केले. त्यामधे त्यांनी पंडित मानिकजी मुंडे यांच्या काही घराणेदार बंदिशी, रेले, पंचदेव स्तुतीपरण असे सादरीकरण केले. ‘धीरधीर’ हा रेला पखवाजवर वाजवून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. मृदंग वादनावेळी त्यांना अभिनय रवंदे यांनी लेहरा साथ दिली.

या प्रसंगी बंडातात्या कऱ्हाडकर उपस्थित होते. ते म्हणाले, ‘वारकरी संगीतावर, अभंगावर फिल्मी संगीताचे आक्रमण होते ही चिंतेची गोष्ट आहे. अभंगांना फिल्मी वा नाट्यपदांच्या चाली लावणे या भ्रष्ट पद्धतींना अटकाव करण्यासाठी सात्विक आणि शुद्ध प्रयत्न आवश्यक आहे. आजकाल अभंग गाणारे आणि भजन गाणारेही अभ्यासाचा अभाव असल्याने अभंग, भजन गायनात शब्द भलते गातात, चालही भ्रष्ट करतात आणि अर्थ ही बदलतात.’

नंदकुमार काकिर्डे म्हणाले, ‘भारतीय संस्कृती व वारकरी संगीताची परंपरा जपण्याचे काम भारतीय विद्या भवन नेहमी करत आले आहे. मूळ संगीत टिकणे, व संस्कृती जपण्यासाठी भारतीय विद्या भवन नेहमी पुढाकार घेते.’

भारतीय विद्या भवन-इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६५ वा कार्यक्रम होता. विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. यादवराज फड यांनी प्रास्ताविक केले. माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search