Next
श्री स्वामी समर्थांचे गुरुमंदिर
BOI
Monday, March 19, 2018 | 02:11 PM
15 0 0
Share this story

‘बाळप्पा मठ ते गुरुमंदिर हा केवळ एक वास्तू किंवा एका परंपरेचा प्रवास नाही, तर अतर्क्य अवधूत श्री स्वामी महाराजांच्या ‘कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम’ सामर्थ्याचा सर्वसामन्यांस ‘अनाकलनीय’ असा अद्भुत प्रवास आहे’, असे विवेक दिगंबर वैद्य यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. हा प्रवास स्वामीभक्तांनी समजावून घ्यावा, यासाठी त्यांनी हे पुस्तक संपादित केले आहे.

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे थोर दत्तावतारी सिद्धपुरुष म्हणून जगभराला ज्ञात असले, तरी ते नेमके कोण होते, या विषयी नेहमीच चर्चा केली जाते; मात्र बाळप्पांसारखा सुखवस्तू घरातील गृहस्थ अचानक अक्कलकोटला येऊन स्वामींचा पट्टशिष्य बनतो आणि पुढे गुरुगादीचा वारसाधिकारी होतो. हे विलक्षण आहे. बालाप्पांचा हा विलक्षण प्रवास या पुस्तकात वाचायला मिळतो. स्वामींनी आपल्या शिष्याला कसे घडविले, त्याचे दोष कसे काढून घेऊन त्यांना गुरुगादी परंपरेची कालसुसंगता हाही विषय त्यानिमित्ताने चर्चिला आहे.

प्रकाशक : पुनर्वसू प्रकाशन
पाने : २२४
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link