Next
फेडेक्स एक्स्प्रेसतर्फे ‘स्मॉल बिझनेस’स्पर्धेचे अंतिम स्पर्धक जाहीर
प्रेस रिलीज
Tuesday, July 31 | 06:19 PM
15 0 0
Share this story

पुणे : फेडेक्स कॉर्पची उपकंपनी असलेल्या ‘फेडेक्स एक्स्प्रेस’ कंपनीतर्फे ‘स्मॉल बिझनेस ग्रँट कॉन्टेस्ट’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली असून, स्पर्धेच्या पुढील टप्प्यात, अंतिम फेरीत निवड झालेले स्पर्धक आपल्या विकास योजना परीक्षण मंडळासमोर सादर करतील. या स्पर्धेच्या विजेत्याला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. विजेत्याचे नाव २३ ऑगस्ट रोजी घोषित करण्यात येईल. अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. 

या स्पर्धेसाठी ४५० हून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. यात विविध उद्योगक्षेत्रांचा समावेश होता. बाह्य सल्लागार फर्मतर्फे या अर्जांची छाननी करण्यात आली. नव्या बाजारपेठांमध्ये व्यवसायाच्या विस्तारीकरणाची प्रेरणा, व्यवसायाकडून या अनुदानाचा वापर कशा प्रकारे होणार आहे आणि व्यवसायांची आर्थिक कामगिरी या तीन निकषांवर या व्यवसायांचे मूल्यमापन करण्यात आले. ज्या व्यवसायांची सेवा वा उत्पादन नावीन्यपूर्ण आहे किंवा ज्या व्यवसायांनी समाजावर सकारात्मक परिणाम केला आहे, त्यांना अतिरिक्त क्रेडिट्स देण्यात आले. या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी नोंदणी करण्यात आलेल्या प्रवेशिकांमध्ये लघुउद्योगांची संख्या खूप होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेशिकांमध्ये दुपटीने वाढ झाली होती.

‘या स्पर्धेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही अत्यंत समाधानी आहोत. भारतातील लघु उद्योगांना असलेल्या संधीची त्यांना जाणीव आहे. त्यांना नव्या बाजारपेठांमध्ये विस्तारीकरण करण्याची प्रचंड तळमळ आहे, हेच यातून दिसून येते’, असे भारतातील फेडेक्स एक्स्प्रेसच्या ग्राउंड ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष फिलीप चेंग यांनी सांगितले. 

‘फेडेक्समध्ये आम्ही माणसे आणि शक्यता यांना दररोज जोडत असतो. उद्योगांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी साहाय्य व मार्गदर्शन करत असतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी स्मॉल बिझनेस ग्रँट कॉन्टेस्ट’ हा आदर्श प्लॅटफॉर्म आहे. आमच्याकडे उत्तमोत्तम प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. नव्या बाजारपेठांमध्ये विस्तारीकरण करण्याची क्षमता असलेली एक सरल, उपयुक्त बिझनेस आयडिया हा या सर्व प्रवेश अर्जांमधील समान धागा होता’, असेही चेंग यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link