Next
पुणे येथे ‘एचसीएल’तर्फे परिसंवाद
प्रेस रिलीज
Wednesday, May 09, 2018 | 05:20 PM
15 0 0
Share this article:

पुणे : एचसीएल फाउंडेशन ही एचसीएल टेक्नोलॉजीची सीएसआर शाखा असून, त्यांनी सलग तिसऱ्या परिसंवादाचे आयोजन पुण्यातील पत्रकार भवनात करण्यात आले होते.

दिवसभर चाललेल्या या परिसंवादात राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विजय वावारे, शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रताप भोसले, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ (औरंगाबाद) कार्यकारी संचालक विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र एनजीओ फेडरेशन आणि एचसीएल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. यात आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, रोजगार अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एनजीओंनी सहभाग घेऊन त्यांचे अनुभव आणि आव्हाने उपस्थितांसमोर मांडली.

हैदराबाद आणि जम्मू येथे झालेल्या पहिल्या व दुसऱ्या परिसंवादाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. एनजीओंनी पुढाकार घेत समाजाच्या विकासासाठी आपल्या कार्याचा नमुना सादर केला. या कार्यक्रमाला २०० सहभागीदार राज्याच्या विविध ठिकाणांहून आले होते. हा परिसंवाद एचसीएल फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या क्षमता उभारणीचा भाग होता. पहिल्या वर्षी कोलकाता, मुंबई, पटना, रायपुर, गुवाहाटी, चंडीगड, इंफाळ, जयपूर, विजयवाडा आणि भुवनेश्वरसारख्या शहरांमध्ये ११ परिसंवादांचे आयोजन करण्यात आले.

क्षमता उभारणी उपक्रमाचा भाग म्हणून चर्चासत्र आणि खुले सत्र स्थानिक एनजीओ प्रतिनिधी व समाजातील तज्ज्ञ यांच्या साथीने घेण्यात आले. टिकाऊ विकास उद्दिष्ट्ये  गवसण्यासाठी धोरणात्मक सीएसआर, ग्लोबल टू लोकल व स्थानिक भागांच्या विकासासाठी आव्हाने व संधी, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या संकल्पना होत्या. हे परिसंवाद भोपाळ, रांची, कोइम्बतुर, उदयपुर, वडोदरा, देहरादून, बंगळूरू, नवी दिल्ली आणि इटानगर अशा इतर नऊ ठिकाणी होणार आहेत.

एचसीएल फाउंडेशनच्या सीएसआर आणि प्रमुख, संचालक निधी पुंधीर म्हणाल्या की, ‘आजचा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण भारतातील आमचा सलग तिसरा परिसंवाद आहे. आम्हाला आशा वाटते की, या परिसंवादातून आम्ही सक्षमपणे मागास ग्रामीण भागात क्षमता विकासात मोलाचे योगदान देऊ. तसेच कल्पना आणि उपाययोजना मांडू. या राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे उद्दिष्ट्य कल्पक, नि:पक्षपाती मूल्य विकास नमुन्यांना भाल करण्याचे आहे. ज्यामुळे क्षेत्राविषयी चांगली माहिती एनजीओंना जाणून घेण्यासाठी मदत होईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search