Next
गिरिजाशंकर सोसायटीतर्फे गरजूंना सायकली भेट
सायकल-रिसायकल संस्थेचा उपक्रम
BOI
Monday, June 24, 2019 | 04:36 PM
15 0 0
Share this article:

गिरिजाशंकर सोसायटीतर्फे जुन्या सायकली गरजू मुलांना देण्याकरता सायकल-रिसायकल संस्थेकडे सुपुर्द केल्या. या वेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, लीनता वैद्य, मंजिरी लेले, संदीप खर्डेकर, हर्षद अभ्यंकर, रवींद्र गोखले, संजय काबाडे आदी

पुणे : कोथरूड भागातील गिरिजाशंकर सोसायटीतील रहिवाशांनी आपल्याकडील वापरात नसलेल्या सायकली गरजू मुलांना देण्याचा अभिनव उपक्रम राबवला आहे. सायकल-रिसायकल संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून, सोसायटीने १७ सायकली संस्थेकडे दिल्या आहेत.

या प्रभागातील नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी, २४ जून रोजी सोसायटीच्या वतीने या सायकली संस्थेकडे सुपुर्द करण्यात आल्या. या वेळी  सायकल रिसायकल संस्थेच्या लीनता वैद्य, मंजिरी लेले, वैशाली तुळपुळे, मंजिरी कुलकर्णी,  हेमंत काळे, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक’चे हर्षद अभ्यंकर आणि गिरिजाशंकर सोसायटीचे सचिव रवींद्र गोखले, खजिनदार आनंद शेलार, अध्यक्ष संजय काबाडे, सोपान वावरे, काशीनाथ पटवेकर, अरुण दिघे, संजीवनी महाजन, भालचंद्र कुलकर्णी आदी मान्यवर  उपस्थित होते.

या वेळी मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या, ‘सायकल रिसायकल संस्थेचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या सहकार्याने संपूर्ण प्रभागात पडून असलेल्या सायकली संकलित करून गरजूंना देण्यात येतील. ज्या गोष्टी आपल्या अडगळीच्या वाटतात त्या अन्य कोणासाठी तरी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे अशा वस्तू संकलित करून त्या गरजूंना देण्यासाठी पुढाकार घेत आहोत.’ 

‘आमच्या सोसायटीत पडून असलेल्या सायकलींचा योग्य वापर व्हावा, असे आम्हाला वाटत होते. सभासदांनीही  आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि १७ सायकली जमा झाल्या. गरजूंना त्या भेट देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे,’ अशी भावना सोसायटीचे सचिव रवींद्र गोखले यांनी व्यक्त केली. 


‘ज्या मुलांना शाळेत जाण्यासाठी सात-आठ किलोमीटर  पायपीट करावी लागते. ज्यांना बस किंवा अन्य वाहन उपलब्ध नसते. अशा मुलांना लोकांकडील वापरात नसलेल्या सायकली जमा करून देण्याच्या उद्देशाने सायकल रिसायकल ही संस्था स्थापन केली. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे,’ असे   मंजिरी लेले यांनी सांगितले.

‘सायकल विनावापर पडून असणे हे भूषणावह नाही. त्या भेट देण्यापेक्षा अधिकाधिक लोकांना सायकल चालविण्यास प्रेरित करणे आवश्यक आहे,’ अशी भूमिका ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक’चे हर्षद अभ्यंकर यांनी मांडली. 

‘लोकांनी शक्यतो चांगल्या स्थितीतील सायकल दिल्यास त्या गरजूंपर्यंत पोहोचविताना फारशी अडचण येणार नाही; तसेच सायकलच्या दुरुस्तीचा खर्चही संबंधीत व्यक्तीने उचलल्यास उत्तम होईल,’ असे सायकल रिसायकल संस्थेच्या संस्थापक लीनता वैद्य यांनी सांगितले. 
  
‘क्रिएटिव्ह फाउंडेशन आहे रे (देणारे )आणि नाही रे यांच्यातील माध्यम म्हणून काम करत असून, दान सत्पात्री असावे या भूमिकेतून कार्यरत आहे. पुढील काळात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येईल,’ असे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sharad Kulkarni ( B 2 / 2. (G .S. Vihar) About 84 Days ago
Thank you very much . Very nice event. Keep it up . All the best.
0
0

Select Language
Share Link
 
Search