Next
तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘कलंक’चा टीझर प्रदर्शित
BOI
Tuesday, March 12, 2019 | 06:24 PM
15 0 0
Share this story


मुंबई : डोळे दिपावणारे सेट्स आणि भव्यदिव्य रंगीबेरंगी दृश्ये दिसणारा आगामी ‘कलंक’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अखेर चित्रपटाच्या टीझरमधून प्रेक्षकांची ताणली गेलेली उत्कंठा काही अंशी कमी झाली असेल, असेच म्हणावे लागेल.

वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी सगळी बडी कलाकार मंडळी असलेल्या या चित्रपटाबाबत उत्सुकता नसेल तर नवलच. जेमतेम दोन मिनिटांच्या असलेल्या या टीझरमध्ये उंची वेशभुषेतील कलाकार, मोठमोठे महल आणि भारदस्त संवाद, चित्रपटाची अनोखी सैर घडवतात. हा टीझर पाहून चित्रपट एखाद्या शाही कथेवर असावा असा अंदाज येतो. 

चित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली असल्याने हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु १९४०मधली ही कथा असल्याचे सांगितले जात आहे. ‘जब किसी और की बरबादी अपनी जीत जैसी लगे, तो हमसे ज्यादा बरबाद और कोई नहीं इस दुनिया में’, ‘कुछ रिश्ते कर्जो की तरह होते है, उन्हे निभाना नहीं चुकाना पडता है’ असे दमदार आणि हरखून टाकणारे संवाद या दोन मिनिटांच्या टीझरमध्ये आहेत. यामुळे चित्रपटाबाबतची उत्कंठा अधिक वाढते. 

१९४०च्या दशकातली एक ही एक कौटुंबिक कथा आहे. शाही घराण्यातील देव, सत्या, रुप, जफर या पात्रांभोवती फिरणारी आणि कुटुंबातील, काही न उलगडलेली सत्य सांगणारी. चित्रपटात आलिया ‘रुप’ या राजकुमारीच्या भूमिकेत आहे. माधुरी ‘बेगम बहार’च्या, वरुण धवन ‘जफर’च्या भूमिकेत आहे, सोनाक्षी ‘सत्या चौधरी’, संजय दत्त ‘बलराज चौधरी’ आणि आदित्य रॉय कपूर ‘देव चौधरी’च्या भूमिकेत आहेत. 

दिग्दर्शक करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’चा हा चित्रपट असून करणने आपला जीव ओतून या चित्रपटासाठी मेहनत घेतली असल्याचे दिसते. आपल्या वडिलांचे एक स्वप्न होते, जे त्यांनी जाण्यापूर्वी पाहिले होते, ते या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण करत असल्याचे करणने सांगितले आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link