Next
‘विकासाच्या नावाखाली विनाश होऊ नये’
प्रेस रिलीज
Monday, July 23 | 03:08 PM
15 0 0
Share this story

महापालक राष्ट्रीय सन्मानप्रसंगी डावीकडून हरीश बुटले, डॉ. राजाभाऊ दांडेकर, डॉ. अशोक कुकडे, डॉ. राजेंद्र सिंह, मीनासिंह, सुरेखा शहा, पूजा सिंह, रोहिणी बुटले व डॉ. कुमार सप्तर्षी.

पुणे : ‘विकासाच्या नावाखाली आपण अनेक विनाशकारी गोष्टींना आमंत्रण देत आहोत. आज अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत. गंगेचे पाणी पिण्यायोग्य नाही. एवढेच नाही, तर पुण्यातल्या मुळा-मुठा नदीकडे पहिले, तर आपण निसर्गावर किती अन्याय करतोय हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे विकासाच्या नावावर निसर्गाचा विनाश होऊ नये,’ असे प्रतिपादन भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनी केले.

आंतरराष्ट्रीय पालकदिनाच्या निमित्ताने डीपर, सर फाउंडेशन व ‘तुम्ही-आम्ही पालक’ यांच्यातर्फे दिला जाणारा ‘महापालक राष्ट्रीय सन्मान’ पुरस्कार यंदा जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह आणि मीनासिंह यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सौभाग्यलंकार असे महापालक सन्मानाचे स्वरूप होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते.

कोथरूड येथील जेपी नाईक सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. राजाभाऊ दांडेकर, सर फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले, उपाध्यक्षा रोहिणी बुटले आदी मान्यवर उपस्थित होते. लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक कुकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी ‘तुम्ही-आम्ही पालक’च्या सहाव्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले.

डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, ‘विकासाच्या नावावर आज पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम होणार असून, ते टाळण्यासाठी निसर्ग आणि मानवता यांच्यातील सहसंबंध जपण्याची गरज आहे. आज आपण विकासाला पुढे करून जागतिक महासत्ता बनण्याच्या आणि विश्वगुरू बनण्याच्या गप्पा मारतो आहोत; मात्र, विकास आणि जीडीपी यामध्ये ती क्षमता नाही. निसर्ग संवर्धन आणि मानवता ही जगातील सर्वश्रेष्ठ मूल्य आहेत. त्याच्या जोरावरच आपण विश्वगुरू बनू शकतो. विकास ही संकल्पना आकर्षक वाटणारी असली, तरीही विकासाच्या नावाखाली होणारा ऱ्हास मानवाच्या भावी पिढ्यांसाठी पोषक नाही.’

डॉ. कुकडे म्हणाले, ‘लातूरसारख्या दुष्काळी पट्ट्यात गेल्या दोन वर्षांपासून मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यापूर्वी रेल्वेने पाणी आणण्याची वेळ लातूरवर आली होती; पण आता इथले लोक निसर्गाप्रती संवेदनशील झाले आहेत. संघटित होऊन निसर्ग संवर्धनाच्या कामात लागले आहेत. या सगळ्या कामामागे डॉ. राजेंद्र सिंह यांच्या कामाची प्रेरणा आणि मार्गदर्शन आहे. अशा आदर्श पालकत्वामुळेच समाजस्वास्थ्य टिकून राहत असते.’

मीना सिंह आणि डॉ. दांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत-प्रास्ताविक हरीश बुटले यांनी केले. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी बुटले यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link