Next
‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे’
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
BOI
Tuesday, February 26, 2019 | 06:08 PM
15 0 0
Share this article:

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेमुंबई : ‘पाकव्याप्त काश्मीरमधील ‘जैश’चे दहशतवादी अड्डे भारतीय वायू दलाने एअरस्ट्राईकने उद्ध्वस्त करून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले सर्व दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारताने पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावा,’अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानवर हवाई हल्ला करून जबरदस्त एअरस्ट्राईक केल्याबद्दल भारतीय वायुदलाच्या शूर जवानांचे रामदास आठवले यांनी अभिनंदन केले. ‘आपल्या भारतीय सैन्यातील जवान अतुलनीय शूर असून, आपल्या जवानांचा आम्हाला अभिमान आहे,’ असे आठवले म्हणाले. 

‘काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलावर दहशवादी हल्ला झाल्यानंतर सर्व देशभर आतंकवाद्यांविरुद्ध संतापाची, निषेधाची लाट उसळली होती. आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे. पाकिस्तानशी आरपारची लढाई लढावी; सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तनाला धडा शिकवावा, अशी जनभावना व्यक्त झाली होती. त्यामुळे भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवादी अड्डे उध्वस्त केले. या कारवाईचे खूप समाधान आहे,’असे आठवले म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search