Next
शालेय विद्यार्थ्यांची ‘सायन्स व्हिलेज’ला भेट
प्रेस रिलीज
Monday, November 06, 2017 | 06:10 PM
15 0 0
Share this article:

चेन्नई येथे आयोजित ‘सायन्स व्हिलेज’ उपक्रमाला भेट देताना कासारी गावातील शाळेतील विद्यार्थी व शिक्षक.
पुणे :   खासदार अनिल शिरोळे  यांच्या मदतीमुळे कासारी गावातील पाच शालेय विद्यार्थ्यांना चेन्नईमधील 'सायन्स व्हिलेज'ला भेट देण्याची संधी मिळाली. 

शिरोळे यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या शिरूर तालुक्यातील कासारी गावातील सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्रणव गायकवाड, आतिश खरात, अविष्कार लवंदे, प्रतीक फाफळे व अभिजीत विरोळे या पाच विद्यार्थ्यांनी नुकतीच चेन्नईमधील  ‘सायन्स व्हिलेज’ उपक्रमाला भेट दिली. केंद्रीय पृथ्वी मंत्रालयाच्यावतीने चेन्नई येथे ‘सायन्स व्हिलेज’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता.  

या  विद्यार्थ्यांनी ‘बिर्ला ऑडिटोरियम’ सह ‘सागरनिधी’ या  जहाजाला देखील भेट दिल्याची माहिती, दौऱ्यात सहभागी झालेले शाळेतील शिक्षक शिवाजी पाखरे ह्यांनी दिली. 

प्रथमच एवढ्या मोठ्या प्रदर्शनाला भेट देण्याबरोबरच देशपातळीवरील शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे ‘शास्त्र’ विषयाबद्दल अधिक आवड निर्माण झाल्याचे, प्रणव गायकवाड या ११ वीतील विद्यार्थ्याने नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search