Next
आधुनिक एजी डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी कार्यान्वित
प्रेस रिलीज
Thursday, February 15 | 02:01 PM
15 0 0
Share this story

‘एजी डायग्नोस्टिक्स’बाबत माहिती देताना डॉ. अजित गोळविलकर. त्यांच्या समवेत डॉ. अवंती गोळविलकर- मेहेंदळे आणि डॉ. विनंती गोळविलकर- पाटणकर, डॉ. मनीषा पटवर्धन, डॉ. मधुवंती अभ्यंकर
पुणे : रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रात पुण्यातील एक अग्रगण्य नाव असलेले  डॉ. अजित गोळविलकर हे यापुढे नव्यानेच कार्यान्वित झालेल्या एजी डायग्नोस्टिक्स या रोगनिदान लॅबोरेटरीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून व्यवस्थापन सांभाळणार आहेत. गोळविलकर मेट्रोपोलीसमधील त्यांची भागीदारी आता संपुष्टात आली असून डॉ. गोळविलकर यांनी स्वतंत्रपणे एजी डायग्नोस्टिक्स ही कंपनी सुरू केली आहे. अद्ययावत उपकरणे, रोगनिदानात पारंगत असलेले पॅथोलॉजिस्ट आणि प्रशिक्षित व कुशल तंत्रज्ञ असलेल्या एजी डायग्नोस्टिक्सला आता डॉ. अजित गोळविलकर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यांच्या दोन्ही कन्या डॉ. अवंती गोळविलकर- मेहेंदळे आणि डॉ. विनंती गोळविलकर- पाटणकर यांचा या लॅबोरेटरीच्या व्यवस्थापनात व रोगनिदान सेवेत सहभाग असणार आहे.

‘आजच्या धकाधकीच्या जीवनात वैद्यकीय व रोगनिदान तपासण्यांचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. या तपासण्या सुयोग्य रितीने व माफक दरात नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एजी डायग्नोस्टिक्स करेल याची मी ग्वाही देतो,’असे डॉ. अजित गोळविलकर यांनी या नवीन लॅबोरेटरीची घोषणा करताना सांगितले. एजी डायग्नोस्टिक्समधील सल्लागार रोगनिदानशास्त्रज्ञ डॉ. अवंती गोळविलकर- मेहेंदळे, डॉ. विनंती गोळविलकर- पाटणकर, कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. मनीषा पटवर्धन, डॉ. मधुवंती अभ्यंकर आणि मिलिंद देवरे या वेळी उपस्थित होते

‘विविध वैद्यकीय तपासण्यांची अद्ययावत सुविधा पुरवणा-या एजी डायग्नोस्टिक्सचे प्रमुख केंद्र पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भांडारकर रस्त्यावरील टीव्हीएस शो -रूमच्या समोर आहे. पुण्यात कोथरूड, औंध, सूस, पाषाण, शिवाजीनगर, कल्याणीनगर, हडपसर, कोंढवा आणि पिंपरीसह एकूण ३० ठिकाणी लॅबोरेटरीची कलेक्शन सेंटर्स आहेत’, असे त्यांनी सांगितले.

डॉ. अवंती गोळविलकर- मेहेंदळे म्हणाल्या, ‘मधुमेह, कर्करोग, वंध्यत्त्व, हॉर्मोन्स, संसर्गजन्य आजार, हृदयाच्या आरोग्याशी संबंधित ‘कार्डिअॅक मार्कर्स’, तसेच मूत्रपिंड व यकृताला होणारे संसर्ग यांसह विविध प्रकारच्या रोगनिदान तपासण्या या लॅबोरेटरीमध्ये केल्या जातात. भांडारकर रस्त्यावरील केंद्रात क्ष-किरण तपासणी, ईसीजी आणि स्ट्रेस टेस्ट, मॅमोग्राफी या तपासण्यांबरोबर फिजिशियन डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणीची सुविधाही उपलब्ध असणार आहे. वयस्कर तसेच हिंडू-फिरू न शकणा-या रुग्णांच्या सोईसाठी एजी डायग्नोस्टिक्सतर्फे रुग्णांच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.’

‘अनेक रुग्णांना रक्तचाचणीसाठी सुईने रक्त काढून घेण्याची भीती वाटते. अशा रुग्णांना तसेच इतरही सर्वच रुग्णांना तपासणीसाठी रक्त देताना कमीत- कमी त्रास व्हावा याची पूर्ण खबरदारी एजी डायग्नोस्टिक्समध्ये घेतली जाते. रुग्णाच्या शरीरातून तपासणीसाठी रक्त घेण्याचे काम करणारे अतिशय कुशल असे ‘फ्लेबोटॉमिस्ट’ या लॅबोरेटरीत सेवा देतात,’ असे डॉ. विनंती गोळविलकर- पाटणकर यांनी सांगितले. ‘लॅबोरेटरी तपासण्यांच्या अचूकतेवर भर देतानाच त्यांचा खर्चही सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्यात असावा, याची विशेष काळजी लॅबोरेटरीतर्फे घेण्यात आली आहे’, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. अजित गोळविलकर यांनी ४० वर्षांपूर्वी पुण्यात जागतिक दर्जाच्या रोगनिदान सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न पाहिले आणि १९७८ मध्ये कर्वे रस्त्यावर ‘गोळविलकर लॅबोरेटरीज’ या नावाने रोगनिदान लॅबोरेटरी सुरू केली. रोगनिदान तपासण्यांचा उत्तम दर्जा, कमी वेळात हाती येणारे तपासण्यांचे अहवाल आणि परवडण्याजोगे दर यांसाठी अल्पावधीतच त्यांचे नाव पुण्यासह देशभरात अग्रक्रमाने घेतले जाऊ लागले. रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेण्याचे महत्त्व प्रथम त्यांनी ओळखले आणि पुण्यात १९७८ पासूनच ही सुविधाही उपलब्ध करून दिली. विविध रोगनिदान तपासण्या आणि अद्ययावत उपकरणे पुण्यात सर्वप्रथम आणण्याचे श्रेयही डॉ. गोळविलकर यांनाच जाते. या सर्व गोष्टींमुळे पुण्यातील अनेक कुटुंबांच्या तीन ते चार पिढ्या गोळविलकरांच्या लॅबोरेटरीतच वैद्यकीय तपासण्या करून घेण्यास प्राधान्य देतात.

डॉ. गोळविलकर यांच्या कन्या- डॉ. अवंती गोळविलकर- मेहेंदळे आणि डॉ. विनंती गोळविलकर- पाटणकर यादेखील याच क्षेत्रात कार्यरत असून दोघींनीही बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून रोगनिदानशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. डॉ. अजित गोळविलकर यांच्याच पावलावर पाऊल ठेवून डॉ. अवंती आणि डॉ. विनंती यांनी त्यांच्या लॅबोरेटरीत काम करण्यास सुरूवात केली. ‘हिस्टोपॅथोलॉजी’ व ‘इम्यूनोलॉजी’ हे डॉ. अवंती यांच्या, तर ‘हेमॅटोपॅथोलॉजी’ व ‘मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक्स’ हे डॉ. विनंती यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link