Next
‘पेटीएम मनी’तर्फे आयकर बचतीसाठी ‘इन्व्हेस्टमेंट पॅक’
प्रेस रिलीज
Saturday, March 23, 2019 | 01:42 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : पेटीएम मनी या म्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी असलेल्या मंचाने ग्राहकांना आयकर बचतीसाठी विशेष इन्व्हेस्टमेंट पॅक तयार केले आहेत. यात चार इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ईएलएसएस) म्युचुअल फंड आहेत व यांची गुंतवणूक दोन हजार रुपयांपासून सुरू होते.

आपल्या करबचत प्रेरित गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोत वैविध्यता आणणाऱ्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. पेटीएम मनी तत्काळ ईएलएसएस टॅक्स स्टेटमेंटदेखील देत असून, याची मागणी थेट पेटीएम मनी अॅपवरून करता येते. हे स्टेटमेंट गुंतवणुकीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.

आयकर अधिनियम १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत गुंतवणूकदार दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात व टॅक्स सेव्हर इन्व्हेस्टमेंट पॅकद्वारे वार्षिक ४६ हजार ८०० रुपये वाचवू शकतात. या पॅकमध्ये ‘एसआयपी’द्वारे किंवा एकरकमी पैसे भरण्याचे पर्याय आहेत. त्याखेरीज, गुंतवणूकदार टॅक्स सेव्हर इन्व्हेस्टमेंट पॅकचा भाग नसलेले ‘ईएलएसएस’ फंडदेखील अॅक्सेस करू शकतात.

पेटीएम मनीवर ग्राहक देशातील अग्रणी असलेल्या मॅनेजमेंट्स कंपनीजद्वारे सादर करण्यात आलेल्या विविध ‘ईएलएसएस’ म्युच्युअल फंड्समधून निवड करू शकतात. ‘ईएलएसएस’ स्कीम ५०० रुपयांपासून सुरू होतात. यात युपीआय, नेटबँकिंग, डेबिट कार्ड आणि ऑटोपेमार्फत १९०हून अधिक बँकांच्या माध्यमातून सुलभ पेमेंटची सुविधा आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search