Next
‘डीकेटीई’तील २८ विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीत निवड
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 04:32 PM
15 0 0
Share this story

कॅपजेमिनी या नामवंत कंपनीमध्ये निवड झालेले ‘डीकेटीई’चे इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थी.

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या इंजिनीअरिंग विभागात कॅपजेमिनीने आयोजित केलेल्या कँपस इंटरव्ह्यूमध्ये तब्बल २८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक ३.१५ लाख इतके पॅकेज देण्यात आले. गतवर्षी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन यावर्षी फक्त ‘डीकेटीई’साठी कँपसचे आयोजन केले होते.

कॅपजेमिनी ही फ्रान्स स्थित जागतिक नामांकित सॉफ्टवेअर निर्मिती कंपनी असून, जगभरात अनेक देशामध्ये कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस आहेत. सध्या नोकरीच्या क्षेत्रात आयटी कंपन्यांचा दबदबा आहे आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्याने हे यश मोठे मानले जाते आहे. या कँपस इंटरव्ह्यूमध्ये महाविद्यालयातील सुमारे १२५ विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. मुलांची बुद्धिमत्ता चाचणी, ई-मेल लेखन, टेक्निकल  व मॅनेजरियल मुलाखत अशा विविध स्तरावर तपासणी करून विविध इंजिनीअरिंग विभागातील एकूण २८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ‘डीकेटीई’तून गुणवत्तेच्या निकषावर निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी निवडीत बाजी मारली आहे.

या विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड होण्यासाठी संस्थेने या विद्यार्थ्यांची सॉफ्ट स्कील चाचणी तसेच त्याबद्दलचे मार्गदर्शन आणि टेक्निकल मुलाखातीसाठीही कॉलेजच्या तज्ञ प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्र व कंपन्यांमधील आजची गरज आणि आवश्यकता यांची जाणीव करून देण्यासाठी विविध नामांकित कंपन्यातील मान्यवरांची मार्गदर्शन सत्रे आयोजित केली. त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्याना इंटरव्ह्यूमध्ये होत आहे.

निवड झालेले विद्यार्थी याप्रमाणे आहेत- कॉम्प्युटर विभागामधून रितू आलासे, आरती रावण, अमृता पालणकर, सोनम केशरवाणी, नंदकुमार गंगाई, ज्ञानदा देशपांडे, मेघना पाटील, बेनझीर कोतवाल, धनश्री डोंगरे, अश्‍विनी चौगुले, रोहित हजारे, प्रियांका महागांवकर, नीलम राणे. आयटी विभागामधून सुरभी कुलकर्णी, रश्मी पठाण, सुमैया फकीर, स्नेहल बोटे, प्रियांका पाटील. इलेक्ट्रॉनिक्स विभागामधून ओंकार पवार, धनश्री नुली, मिनाज शेख, पल्लवी पाटील, अपेक्षा घाटगे, आशिष कुंभार. ईटीसी विभागामधून पूजा अर्दाळकर, स्नेहल उगळे, समीक्षा चौगुले आणि पल्लवी कांबळे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ‘डीकेटीई’ संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे. डायरेक्टर प्रशाकीय डॉ. यु. जे. पाटील, डे. डायरेक्टर शैक्षणिक प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे यांसह सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या प्लेसमेंटसाठी इंजिनीअरिंग टीपीओ प्रा. जी. एस. जोशी यांनी विशेष परीश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link