Next
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, December 11 | 12:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे ११ डिसेंबर २०१८ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हात दिला जाणार आहे.

हा कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दुपारी दोन ते संध्याकाळी सहा या वेळेत होणार आहे. या वेळी ‘राष्ट्रवादी’च्या मासिकाच्या डिसेंबर महिन्यातील अंकाचा प्रकाशन सोहळा आणि १०० टक्के बूथ कमिटी स्थापन करणार्‍या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा गौरव व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

या वेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
मंगळवार, ११ डिसेंबर २०१८
वेळ : दुपारी दोन ते सायंकाळी सहा
स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link