Next
संस्कारक्षम वह्यांचे २७ जूनला वाटप
म्हाळूपार्वती प्रतिष्ठान व आराध्या फाउंडेशनचा उपक्रम
BOI
Wednesday, June 26, 2019 | 05:16 PM
15 0 0
Share this article:

पुणे : म्हाळूपार्वती प्रतिष्ठान व आराध्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेच्या आठवी, नववी, दहावीतील गरजू व होतकर मुलांना संस्कारक्षम वह्यांचे २७ जून २०१९ रोजी मोफत वाटप केले जाणार आहे. उद्योजक रोहन गजेंद्र पवार (पिनॅकल ग्रुप) यांच्या हस्ते वह्यांच्या मुखपृष्ठाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. 

जनवाडी, गोखलेनगर, वडारवाडी, वाकडेवाडी, औंध, बाणेर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुविचार संदेश असलेल्या या संस्कारक्षम मुखपृष्ठांच्या वह्यांचे वाटप केले जाणार असल्याचे नीलेश प्रकाश निकम यांनी सांगितले. 

या प्रसंगी प्रकाश म्हाळू निकम, पूनम शैलेश हेंद्रे, विलास म्हाळू निकम, बबन म्हाळू निकम, अरुण सयाजी औचरे, विशाल शंकर सुर्वे, बाळासाहेब श्रीपती हेंद्रे, शैलेश बाळासाहेब हेंद्रे, अतुल शिवाजी जोशी, डॉ. संजय विष्णू जोशी, श्रद्धा रवींद्र जोशी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 107 Days ago
What was the number who benefited ?
0
0

Select Language
Share Link
 
Search