Next
‘मिस्टर इंडिया’ पुन्हा पडद्यावर?
BOI
Monday, June 03, 2019 | 05:47 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून देणारा ९०च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘मिस्टर इंडिया’ पुन्हा नव्याने येणार या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आले आहे. निर्माते बोनी कपूर या चित्रपटाच्या कथेवर विचार करत असल्याचे सुत्रांकडून समजले आहे. 

‘मिस्टर इंडिया’ हा ९०चे दशक गाजवणारा चित्रपट पुन्हा एकदा पडद्यावर येणार अशा चर्चा खरे तर काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सुरू होत्या, परंतु अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकस्मात मृत्यूनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. परंतु नुकत्याच हाती आलेल्या सुत्रांनुसार बोनी कपूर हे या चित्रपटाच्या कथेचा नव्याने विचार करत असून, पुन्हा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


शेखर कपूर
चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसून दिग्दर्शक शेखर कपूर या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपट आधी रिबूट करण्यात येणार असून नंतर त्याची फ्रँच्याइझी करण्यात येणार आहे. याशिवाय नवीन पिढीला अनुसरून आवश्यक ते बदल चित्रपटात करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

दरम्यान अभिनेत्री श्रीदेवी, अनिल कपूर, अमरिश पूरी या सर्वच कलाकारांच्या दृष्टीने हा चित्रपट महत्त्वाचा ठरला होता. तेव्हा आता श्रीदेवी यांच्या जागी कोणती अभिनेत्री? आणि चित्रपटातील लोकप्रिय ठरलेली आणि दिवंगत अभिनेते अमरिश पूरी यांनी वठवलेली मोगँबोची भूमिका कोण करणार?, असे अनेक प्रश्न निर्माते-दिग्दर्शकांसमोर आहेत. तुर्तास यापैकी कशावरही अद्याप शिक्कामोर्तब झाले नसून, लवकरच याबद्दल ठोस काहीतरी समजेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट बोनी कपूर खरेच प्रत्यक्षात आणणार का, आणि प्रेक्षकांना खरेच सुखद धक्का देणार का हे पाहणे उत्सुकतेचे असेल.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search