Next
मॉर्डन कॉलेजमध्ये दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र
दी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचा उपक्रम
प्रेस रिलीज
Friday, January 11, 2019 | 03:21 PM
15 0 0
Share this article:



पुणे : दी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनतर्फे येथील मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅंड कॉमर्स येथे शिक्षण घेणार्‍या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे (कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर) उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी दी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे आणि मॉर्डन कॉलेजचे पदाधिकारी व दृष्टीबाधित विद्यार्थी उपस्थित होते. चार जानेवारी लुई ब्रेल यांचा जन्मदिवस असून, त्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावल्यामुळे दृष्टीबाधित व्यक्तींना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. लुई ब्रेल यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून मॉर्डन कॉलेजमध्ये दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले.
 
कॉम्प्युटर हा आजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मोफत कॉम्प्युटर ट्रेनिंग त्यांच्यासाठी आवश्यक आहे, याच उद्देशाने कॉम्प्युटर ट्रेनिंगचा उपक्रम संस्थेमार्फत राबविला जातो. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन पुणे शहरातील विविध प्रतिष्ठित व नामवंत कॉलेजमध्ये मोफत कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे.
 
दी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन ही सामाजिक संस्था गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ दृष्टीबाधित व्यक्तींसाठी काम करत आहे. दृष्टीबाधित व्यक्ती, विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था धडपडत आहे. दृष्टीबाधित निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम, १८ ते ३५ वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्निकल ट्रेनिंग सेंटर, डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारांसाठी अद्यावत हॉस्पिटल आदी विविध प्रकल्प संस्थेमार्फत राबविले जात आहेत. महाराष्ट्र तसेच, भारतामधील अनेक दृष्टिहीन व्यक्ती संस्थेच्या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search