Next
शिवळे महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
दत्तात्रय पाटील
Wednesday, December 19, 2018 | 01:53 PM
15 0 0
Share this storyठाणे : आजची तरुणाई सजग आहे. ती घडणार्‍या घडामोडींवर बोलू इच्छिते. देशाच्या विकासात सकारात्मक बदल घडविणारी आपली मत सर्वांसमोर मांडण्यासाठी त्यांना व्यासपीठाची गरज आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाचे ठाणे नेहरू युवा केंद्र आणि झुंज प्रतिष्ठान यांच्या वतीने मुरबाड येथील जनसेवा शिक्षण मंडळ संचलित शांताराम भाऊ घोलप कला, विज्ञान व शिवळे येथील गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला जिल्ह्यातील तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाविद्यालयाच्या उपप्राचार्य गिता विशे, प्रा. डॉ. बिराजदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्र निर्माणाचे विचार युवकांमध्ये रुजून सक्षम युवापिढी निर्माण होण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केल्याचे नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक दत्तात्रय पाटील यांनी सांगितले.देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर उपस्थित वक्त्यांनी आपली मते मांडली. देशभक्तीची व्याख्या आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पना या वेळी तरुणांनी मांडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रनिर्माणासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने पुढे येणे गरजेचे आहे कारण हा देश तरुणांचा आहे, असा सूर या वेळी स्पर्धकांमधून उमटला.

प्रा. भास्कर, प्रा. वंदना सिंग व प्रसिद्ध शिवव्याख्याते नवनीत यशवंतराव यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले. सोनिया मिश्रा हिने या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावून राज्यस्तरावरील स्पर्धेत प्रवेश मिळवला. हरिश्चंद्र देसले व राहुल पाटील यांना अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.या वेळी शिवव्याख्याते यशवंतराव तरुणाईशी संवाद साधताना म्हणाले, ‘शब्दांना कृतीत आणून राष्ट्रनिर्मितीसाठी आपण आपले योगदान देऊया, तरच हा देश खऱ्या अर्थाने युवकांचा देश आहे असे म्हणता येईल.’ या वेळी त्यांनी स्पर्धकांना वक्तृत्व कला व त्यातील बारकावे याविषयी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे आयोजक व जिल्हा समन्वयक प्रल्हाद सोनुने यांनीही या प्रसंगी मार्गदर्शन केले.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी दत्तात्रय पाटील व आनंद खरे यांच्यासह झुंज युवाचे जय मनोहरे, संकेत जिंझाड, दीपक सावंत यांनी मेहनत घेतली.

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link