Next
डॉ. श्रीकांत केळकर यांच्या छायचित्रांचे प्रदर्शन
प्रेस रिलीज
Friday, February 01, 2019 | 01:20 PM
15 0 0
Share this article:



पुणे : प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पाच व सहा फेब्रुवारी २०१९ रोजी जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पाच फेब्रुवारीला सकाळी १० वाजता प्रसिद्ध कलाकार रवी परांजपे यांच्या हस्ते केले जाणार आहे.



या प्रसंगी प्रसिद्ध छायाचित्रकार चंद्रशेखर बापट यांची विशेष उपस्थिती असणार आहे. डॉ. केळकर यांचे हे सातवे छायाचित्र प्रदर्शन असून, या प्रदर्शनात विविध संकल्पनांवर आधारित १०० छायाचित्रांचा समावेश असणार आहे. हे प्रदर्शन दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री आठ या दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे.

प्रदर्शनाविषयी :
दिवस :
पाच व सहा फेब्रुवारी २०१९
उद्घाटन : मंगळवार, पाच फेब्रुवारी २०१९
वेळ : सकाळी १० ते रात्री आठ
स्थळ : बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search