Next
शिवानी रांगोळे साकारणार रमाबाई आंबेडकरांची भूमिका
प्रेस रिलीज
Monday, May 20, 2019 | 04:27 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार आहे. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. 

रमाबाई म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचे उच्च शिक्षण असो, आंदोलने असोत वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावलीप्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळले. महापुरुषाची सहचारिणी होण्याचे व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळले. अशा थोर व्यक्तीची भूमिका करायला मिळणे मोठे भाग्यच असल्याचे शिवानीने नमूद केले.

या भूमिकेविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातली ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि ठेहराव असणारे हे कॅरेक्टर आहे. या भूमिकेसाठीचा पेहराव, भाषा या गोष्टीसुद्धा माझ्यासाठी नवे आव्हान आहे. धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचे वाचन मी करत असून, रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मला याचा फार उपयोग होत आहे. यासोबतच दशमी प्रॉडक्शन, स्टार प्रवाह वाहिनी आणि माझे सर्वच सहकलाकार यांच्या पाठिंब्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मला मदत मिळत आहे. रमाबाईंचे कार्य अपार आहे. त्यांचे कार्य या मालिकेतून पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बालपणापासूनचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार असून, ही मालिका १८ मे २०१९ पासून ‘स्टार प्रवाह’वर सोमवार ते शनिवार या कालावधीत रात्री नऊ वाजता प्रसारित केली जाते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search