Next
‘हुजपा’मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नागेश शिंदे
Friday, January 04 | 01:28 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर : येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी भूषविले. या प्रसंगी प्रमुखपाहुणे म्हणून समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. के. कदम, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत आधुनिक मराठी कवितेची जनक सावित्रीबाई फुले असल्याचे नमूद केले

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ. सदावर्ते यांनी ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ हा एकपात्री अभिनय आपल्या तेजस्वी वाणीतून विद्यार्थांसमोर मांडला; तसेच सावित्रीबाईंनी घेतलेल्या शिक्षणाचा वसा आजच्या विद्यार्थिनींनी आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले.

या वेळी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा गजानन दगडे, प्रा. डॉ. वसंत कदम, प्रा मुकेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.  शीतल कल्याणकर हिने सूत्रसंचालन केले. प्रा. गजानन दगडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link