Next
अनुष्का शर्मा स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची ब्रँड अॅम्बेसेडर
प्रेस रिलीज
Friday, April 27 | 05:30 PM
15 0 0
Share this story

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या रिटेल डिजिटल बँकिंग उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी   मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला, ब्रँड अॅम्बेसेडर अनुष्का शर्मा व वरिष्ठ अधिकारी

मुंबई : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने रिटेल डिजिटल बँकिंग उपक्रम दाखल केला असून, या  उपक्रमाला चालना मिळावी या उद्देशाने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अनुष्का शर्माची निवड केली आहे.रिटेल डिजिटल बँकिंग उपक्रमामुळे आता ग्राहकांना तातडीने खाते उघडण्यापासून रिलेशनशिप मॅनेजरशी (आरएम) डिजिटल पद्धतीने संवाद साधण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. 

या बाबत अधिक माहिती देताना बँकेच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला म्हणाल्या, ‘भारतातील तरुण व आकांक्षी युवकांमध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्याने केला जाणारा स्वीकार विचारात घेता, आम्ही रिटेलमध्ये परिवर्तन आणण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. ग्राहक केंद्री दृष्टीकोन कायम ठेवून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना मिळणारा अनुभव संपूर्ण बदलणे; त्यास डिजिटल बाबतीत सक्षम व सुरळीत करणे यावर आमचा भर आहे. आमच्या वाटचालीतील हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. सर्व प्रकारची खाती उघडणे, यूपीआय व्यवहार व व्हर्च्युअल आरएम अशा विविध प्रकारच्या डिजिटल बँकिंग सेवा आम्ही दाखल करत आहोत. यासाठी अनुष्का शर्मा यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ताजेपणा, सकारात्मकता व महत्त्वाकांक्षा आमच्या डिजिटल उपक्रमांशी साधर्म्य सांगणारी आहे. युवकांची पसंतीची बँक असे स्थान आम्हाला मिळवायचे आहे, त्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा  भाग आहे.’

अनुष्का शर्मा म्हणाल्या, ‘भारतातील एकशे साठ वर्षांची पार्श्वभूमी आणि समकालीन, अत्याधुनिक राहण्याचे  प्रयत्न यांची सांगड घालणाऱ्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेशी सहयोग करताना मला अतिशय आनंद होत आहे. विश्वास व एकता जपण्याबरोबरच सातत्याने डिजिटल नावीन्य आणण्याची स्टँडर्ड चार्टर्डची प्रेरणा मला भावली. एक कलाकार म्हणून, विविध प्रकारच्या भूमिका निवडून, तसचं  माझ्या प्रॉडक्शन हाउसमध्ये विविध सिनेमांची निर्मिती करून मी स्वतःला आव्हान देण्याचा प्रयत्न करते. या कॅम्पेनच्या बाबतीत, सातत्याने नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी हा गुण मला माझ्यासारखा वाटला आणि मी उत्पादन व सेवांसाठी ब्रँड अम्बेसेडर व्हायचे ठरवले.’

बँकेने इन्स्टंट डिजिटल खाते उघडण्याची क्षमता वाढवली असून त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन किंवा मोबाइलद्वारे आधार तपशीलाचा वापर करून बचत खाते तातडीने उघडता येईल. विविध प्रकारच्या डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने, ग्राहकांना आता म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येईल. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) व भारत क्यूआर याद्वारे पेमेंट करता येईल. ग्राहकांना आता सर्व्हीस रिक्वेस्टसाठी ऑनलाइन चॅट करता येईल. प्रायॉरिटी व प्रीमिअम बँकिंग ग्राहकांना आरएमच्या मदतीने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिक वेगाने सल्ला घेता येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link