Next
संचेती हॉस्पिटलतर्फे मोफत मणका तपासणी शिबिर
प्रेस रिलीज
Wednesday, April 25 | 06:21 PM
15 0 0
Share this story

पुणे  :  संचेती हॉस्पिटल व हीलीयोस - द  फिजिओ  एक्स्पर्टसतर्फे रविवारी, २८ एप्रिल  रोजी संध्याकाळी चार  ते आठ या वेळेत मोफत मणका विकार तपासणी शिबिराचे (स्पाईन कॅंप) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांना मोफत तपासणी व सल्ला मार्गदर्शन मिळणार आहे. या शिबिरात संचेती हॉस्पिटलमधील स्पाईन सर्जन सहभागी होणार आहेत. या शिबिरामध्ये सवलतीच्या दरात एक्स रे आणि रक्त तपासणी करण्यात येणार असून, शस्त्रक्रियेवर दहा टक्के सवलत मिळणार आहे.  या शिबिरात मणक्याचे जुने आजार, कंबर,मान दुखणे, हातापायांना मुंग्या येणे, स्लिप डिस्क यावरही  मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 ‘रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळे पाठीचा कणा, मणके यांच्या दुखण्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलींमुळे, व्यायाम करण्यासाठीही नागरिकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे यात भरच पडत आहे. यावर उपाययोजना म्हणून संचेती हॉस्पिटलच्या वतीने खास शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना या दुखण्यांवर मात करण्यासाठी मदत मिळेल’, असे मत  संचेती हॉस्पिटलचे संचालक डॉ.पराग संचेती यांनी व्यक्त केले.

या शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता नावनोंदणी आवश्यक आहे.

मणका विकार तपासणी शिबिर 
स्थळ  : संचेती क्लिनिक,  दुसरा मजला, सुप्रीम स्क्वेअर, फेडरल बँकेच्यावर, परिहार चौक, औंध,पुणे.
वेळ : संध्याकाळी चार ते रात्री आठ
नावनोंदणीसाठी संपर्क : ८८८८८ ०८८४२, ९३७०५ ८८८८८
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link