Next
संपूर्ण शाकाहारी सुरुची
BOI
Thursday, April 26, 2018 | 10:27 AM
15 0 0
Share this story

आयुष्यभराचा सोबती असे या पुस्तकाचे वर्णन करायला हरकत नाही. कारण इंदिरा परचुरे यांनी १४०० हून अधिक पारंपरिक व आधुनिक पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत. पहिला विभाग सूप, सार, कधी आणि दुसरा विभाग चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती कशी करावीत हे सांगणारा आहे. भाकरी, पोळ्या आणि पुऱ्या करायला शिकवल्या आहेत. विविध प्रकारच्या भाज्या, कुर्मा, रस्सा नी पालेभाज्यांच्या कृतीचा चौथ्या विभागात समावेश आहे. पिठलं, उसळी, डाळी आणि आमटी, सांबराचे स्वतंत्र विभाग आहेत.

भटांच्या प्रकारातही तेवढेच वैविष्य आहे. ढोकळे, डोसे यांच्याप्रमाणेच वड्या नी वेगवेगळी भजी कशी करायची तेही समजते. सामोसे, कटलेट किंवा आप्प्यांसारखे स्नॅक्स, दिवाळीचे पदार्थ शिकता येतात. उपासाचे पदार्थ, सणावाराचे विशेष पदार्थ, मुलांसाठी खाणे एवढेच नव्हे, तर विविध प्रांतातील पदार्थ असा भरगच्च मेन्यू आहे.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : ५५८
किंमत : ३९९ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link