Next
ऑल न्यू मिनी कंट्रीमॅनचे भारतात पदार्पण
प्रेस रिलीज
Friday, February 09 | 03:53 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतात आयोजित करण्यात आलेल्या् ‘ऑटो एक्स्पो २०१८’मध्ये ‘ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅन’चे अनावरण करण्यात आले. चेन्नई येथील बीएमडब्ल्यू  ग्रुप प्लांंटमध्ये स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेली ऑल-न्यू् मिनी कंट्रीमन तीन व्हेरिएंटसमध्ये उपलब्ध् असेल. दोन पेट्रोल व्हेरिएंटस् - मिनी कंट्रीमन कूपर एस व मिनी कंट्रीमन कूपर एस जेसीडब्लू, तसेच डिझेल व्हेरिएंट - मिनी कंट्रीमन कूपर एसडी. गाडीच्या डिलव्हरीजना जून २०१८पासून सुरुवात होईल आणि त्यानुसार एक्स-शोरूम किंमतींची घोषणा करण्यात येईल. 
 
मिनी रीजन एशिया, पॅसिफिक, साऊथ आफ्रिका आणि इम्पोर्टर रिजन्सचे हेड हेन्रिक विलहेम्समेअर म्हणाले, “अगदी सुरुवातीपासूनच मिनी ब्रँड नवीन कल्पना आणि प्रेरणेसाठी ओळखला जातो. गाडी चालवण्यातला आनंद सातत्याने देणे हे आमच्या डीएनएमध्येच आहे आणि ख्यातनाम मिनी गो-कार्ट फिलिंग प्रत्येक मॉडेलमध्ये मिळतो. दुसऱ्या पिढीच्या मिनी कंट्रीमॅनच्या आवृत्तीमध्ये तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी मुबलक जागेसह अल्टिमेट ऑल-राउंडर गाडीचा अधिक चांगला आणि ठळक अनुभव मिळतो. ऑल न्यूॅ मिनी कंट्रीमॅन अॅडव्हेंचरसाठीच तयार करण्यात आली आहे आणि या गाडीमुळे कोणताही विकेंड बनवता येईल एक साहसी सहल. प्रत्येक मार्गावर एक नवी कहाणी जन्म घेते, अविस्मरणीय आठवणींची एक अशी कहाणी जी कधी संपूच नये, असे तुम्हाला वाटेल.”

‘बीएमडब्ल्यू  ग्रुप इंडिया’चे प्रेसिडंट विक्रम पवाह म्हणाले, “अर्बन वातावरणासाठी मिनी हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि भारतातील प्रिमिअम स्मॉल कार सेगमेंटमध्ये या गाडीने प्रचंड यश संपादन केले आहे. दुसऱ्या आवृत्तीतील ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅन तुम्हाला देते एक फंक्शनॅलिटी, दररोजच्या जीवनातील प्रॅक्टिकॅलिटी आणि लांब पल्ल्यासाठी योग्य सुविधांचा मेळ. विशिष्ट मिनी स्टाइलमध्ये ड्रायव्हिंग फनला वैयक्तिकता आणि करिष्म्याची जोड देण्यात आली आहे. बीएमडब्ल्यू  ग्रुप प्लांट चेन्नई येथील ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅनचे लोकल प्रॉडक्शन म्हणजे, भारतातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.”

मिनी कंट्रीमॅन कूपर एस जेसीडब्लू इन्स्पायर्डमध्ये जॉन कूपर वर्क्स एअरोडायनॅमिक किट, रीअर रूफ स्पॉयलर आणि आकर्षक १८ इंची जेसीडब्लू थ्रिल स्पोक अॅलॉय व्हील्स आहेत. जॉन कूपर वर्क्सचा प्रभाव इल्युमिनिटेड कॉकपिटमध्ये जेसीडब्लू स्पोर्ट्स लेदर स्टिअरिंग व्हीलमध्येही जाणवतो. या गाडीत विविध प्रिमिअम फिचर्स आहेत; जसे लेदर क्रॉसपंच स्पोर्ट सीट्स, हार्मन कार्डन हाय-फाय स्पीकर सिस्टम, मिनी फाइंड मेट आणि मिनी वायर्ड पॅकेज. मिनी वायर्ड पॅकेजमध्ये नेव्हिगेशन सिस्टम प्रोफेशनल आणि टच कंट्रोलरसह मिनी कनेक्टेड एक्सएल ८.८ इंच स्क्रीन आणि ब्ल्यूटूथ मोबाइल कनेक्टिव्हिटी आहे.
 
मिनी कंट्रीमॅन कूपर एसडीमध्ये कूपर एसडी इंजिन आहे. भारतात पहिल्यांदाच ही सुविधा उपलब्ध होत आहे. या इंजिनमुळे १९० एचपी आणि चारशे एनएम इतका टॉर्क मिळतो. अप्रतिम हाताळणीमुळे आता शहराच्या कानाकोपऱ्यातील प्रवास असो की, चढणावरचा प्रवास ते आव्हान राहणार नाही. पॅनोरमा ग्लास रूफ आणि मेमरी फर्दरसह इलेक्ट्रिक सीट अॅडजस्टमेंटमुळे आरामदायीपणा आणि गाडी चालवण्याच्या आनंदात भर पडते.
 
मिनी कंट्रीमॅन कूपर एसमध्ये अभूतपूर्व प्रिमिअम टेक्नॉलॉजी आणि डिझाइन फिचर्स आहेत. स्टँडर्ड सुविधा म्हणून असलेल्या ऑटोमॅटिक टेल गेट, क्रूझ कंट्रोल, एलइडी हेडलाइट, फॉग लाइट, मल्टिफंक्शन स्टिअरिंग व्हील, फ्रंट आणि रीअरला सेंटर आर्म रेस्ट आणि रेडिओ मिनी बूस्ट ६.५ इंच मुळे ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅन कोणत्याही अॅडव्हेंचरसाठी परीपूर्ण ठरते.
 
ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅन पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे : आयलँड ब्ल्यू, लाइट व्हाईट, चिली रेड, मेल्टिंग सिल्व्हर आणि एक्स्ल्युसिवली मिनी कंट्रीमॅन कूपर एस जेसीडब्लू  इन्स्पायर्डसाठी थंडर ग्रे प्लस ब्रिटिश रेसिंग ग्रीन.
ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅनमध्ये स्टँडर्ड अपहोल्स्ट्री म्हणून लेदरेट कार्बन ब्लॅक रंगात आणि ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅन कूपर एस जेसीडब्लू  इन्स्पायर्डसाठी लेदर क्रॉस पंच कार्बन ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link