Next
आयएनआयएफडी डेक्कनचा वार्षिक फॅशन शो उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, January 19, 2019 | 05:10 PM
15 0 0
Share this storyपुणे : येथील आयएनआयएफडी डेक्कन या फॅशन आणि इंटिरिअर डिझाइन इन्स्‍टिट्यूटतर्फे वार्षिक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीच्या वार्षिक फॅशन शोची संकल्‍पना ‘ट्रेझायर- दी अवेकनिंग’ होती.

महिला सक्षमीकरणामुळे आपली क्षमता जाणून घेऊन आपल्‍या आयुष्‍याची आणि व्यवसायाची दिशा निश्चित करण्याबाबत स्त्रिया अधिक सक्षम होत आहेत. त्‍यांना आर्थिक स्‍वातंत्र्य मिळाले आहे. आपल्यातील आत्मविश्वास जागृत करत स्‍वतःची ओळख निर्माण केली आहे. हे करत असताना, महिला त्यांचा व्यवसाय आणि घर, कुटुंबीयांशी असलेली बांधिलकी यांच्यात समतोल राखण्याची काळजी घेतली आहे. जीवनाच्या प्रत्‍येक क्षेत्रामध्ये अचूकतेने आपली भूमिका पार पाडणार्‍या सर्व महिलांना मानवंदना म्‍हणून हा फॅशन शो आयोजित केला होता. मुख्य संकल्‍पनेअंतर्गत दी फ्रॅग्रंट, दी पॉवर अप, दी सिडक्‍ट्रेस, दी वॉरिअर, दी टेर्‌रा, दी फ्युचरिस्टिक, ब्राइड, दी हेरीटेज अशा विविध संकल्‍पना यात होत्या.

या विषयी बोलताना ‘आयएनआयएफडी डेक्कन’चे संचालक अमर खत्री म्हणाले, ‘आयएनआयएफडी डेक्कनने सुरूवातीपासून आतापर्यंत बरीच वाटचाल केली आहे. हजारो तरुणांच्या डिझाइन करिअरला आकार दिल्‍याचा त्‍यांना अभिमान आहे.’कार्यक्रमाला आयएनआयएफडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल खोसला यांची उपस्‍थिती लाभली. भारतीय फॅशन स्‍वीकारायला आता संपूर्ण विश्व तयार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या कार्यक्रमामुळे प्रत्‍येक विद्यार्थ्यामधील सृजनशीलता व्यक्‍त होते आणि भावी डिझायनर म्‍हणून त्‍यांचा संपूर्ण विकास होत असल्याचे फॅशन डिझाइन विभागाच्या विभागप्रमुख शमिका प्रधान यांनी नमूद केले.
 
या कार्यक्रमासाठी अंतर्गत फॅशन मार्गदर्शक म्‍हणून देसी कॉउचर डिझाइन स्‍टोअरचे कनिश आणि शगुन बहल यांनी मार्गदर्शन केले. प्रख्यात नृत्‍यदिग्‍दर्शक आणि टीव्ही जज टेरेन्स लुइस हे कार्यक्रमाचे सेलिब्रिटी अतिथी होते.  उपस्‍थितांमध्ये या कार्यक्रमाच्या अधिकृत ब्‍लॉगर म्‍हणून पुणे शहराच्या सर्वोत्तम ब्‍लॉगर रविना सचदेव होत्‍या. या कार्यक्रमाचे परीक्षण, प्रतिष्‍ठित सौंदर्य तज्‍ज्ञ कार्ल मस्‍कारनीस, संयुक्‍त राष्‍ट्र सुंदरी स्‍पर्धेची पहिली उपविजेती फराह अन्वर आणि पेज थ्री सोशअलाइट आणि यशस्‍वी लक्‍झरी क्‍युरेटर प्रीती मोदी यांनी केले.  या वेळी बोलताना कार्ल म्हणाले, ‘आयएनआयएफडी डेक्कनच्या डिझाइन विभागातील विद्यार्थ्यांमधील प्रचंड प्रतिभामुळे मी प्रभावित झालो आहे.’

शकीर शेख यांनी कार्यक्रमाचे नृत्‍यदिग्‍दर्शन केले होते. केशभूषा आणि रंगभूषा यासाठी आयएसएएस, पुणे यांचे प्रायोजकत्‍व लाभले होते. जनसंपर्क आणि मुद्रण माध्यम भागीदार म्‍हणून हॅजल आउटलूक आणि निर्मिती भागीदार म्‍हणून ई-पॉजिटिव्ह यांनी काम पाहिले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link