Next
‘लेम्मा टेक्नॉलॉजीज’च्या सल्लागारपदी बॉब वॉल्झॅक
प्रेस रिलीज
Tuesday, April 10, 2018 | 03:02 PM
15 0 0
Share this story

बॉब वॉल्झॅक
पुणे : ‘डिजिटल आऊट ऑफ होम ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातील आघाडीच्या आणि प्रोग्रॅमॅटिक ॲडव्हर्टायझिंग सोल्यूशन्स विकसित करण्यावर भर देणाऱ्या ‘लेम्मा टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या सल्लागारपदी बॉब वॉल्झॅक रुजू झाले आहेत’, अशी माहिती कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब पाटील यांनी दिली.
 
ते म्हणाले, ‘बॉब वॉल्झॅक हे विपणन उद्योग प्रवर्तक असून त्यांनी रिंगलीडर डिजिटल या जाहिरात तंत्रज्ञान नवउद्योगाचे संस्थापक व मुख्य कार्य़कारी अधिकारी म्हणून यशस्वी भूमिका बजावली आहे. रिंगलीडर डिजिटल ही मोजक्या पहिल्या कंपन्यांपैकी आहे, ज्यांनी सर्वंकष मोबाईल ॲड सर्व्हर आणि पेटंटप्राप्त आयडी टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. सध्या ते ब्लॉकचेन व क्रिप्टो श्रेणीतील एका प्रकल्पावर काम करत आहेत. या आधी वॉल्झॅक हे झॅसिस कंपनीत ग्लोबल प्रॉडक्ट विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष, डब्ल्यूपीपीच्या प्रोग्रॅमॅटिक ऑडियन्स व्यवसायात होते. त्यांनी झॅसिसच्या लाईट रिॲक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. तत्पूर्वी ते आयपॉनवेबच्या बिडस्विच प्लॅटफॉर्मचे सरव्यवस्थापक होते, जेथे त्यांनी या प्लॅटफॉर्मचे उत्पन्न पाचशे टक्क्यांनी वाढवून दाखवले व वर्षभरात ग्राहक संख्या दुप्पटीने वाढवली. बिडस्विचच्या आधी ते पबमॅटिकमध्ये प्रॉडक्ट अँड इमर्जिंग मीडिया विभागाचे सरव्यवस्थापक व उपाध्यक्ष होते. त्यांनी कंपनीच्या मोबाईल व इमर्जिंग मीडिया व्यवसायाची स्थापना करून केवळ तीन वर्षांतच त्याचा वाटा कंपनीच्या एकूण उत्पन्नात पंचवीस टक्क्यांपर्यंत नेला होता.’
 
नव्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना बॉब वॉल्झॅक म्हणाले, ‘आऊटडोअर मीडिया हा पूर्वीप्रमाणे स्थिर राहिलेला नाही. तो चालतो, बोलतो आणि अगदी विचारही करतो. ‘लेम्मा टेक्नॉलॉजीज’ ही या उद्योगात अशा अभिनव मार्गावर पाऊल ठेवणारी कंपनी आहे. जगातील आघाडीचा डिजिटल आऊट ऑफ होम प्रोग्रॅमॅटिक ॲड एक्स्चेंज प्लॅटफॉर्म बनण्यासाठी, आपला मध्यवर्ती दृष्टीकोन मजबूत राखून ग्राहकांना कमाल परिणाम मिळवून देण्यात मदत करण्यासाठी अभिनवता राबवण्यात आघाडीवर असलेल्या या प्रतिष्ठित कंपनीत काम करताना मला अत्यंत आनंद होत आहे.’
 
कंपनीचे संस्थापक गुलाब पाटील म्हणाले, ‘बॉब वॉल्झॅक यांचे आमच्या लेम्मा परिवारात स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्यांचे कौशल्य व दृष्टीकोन यांची मदत आमच्या कंपनीला अभिनव डिजिटल सोल्यूशन्स पुरवून डीओओएच प्रोग्रॅमॅटिक ॲडव्हर्टायझिंग उद्योगात प्रगती करण्यासाठी होईल. आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्तम सेवा व सोल्यूशन्स पुरवण्याचा आमचा प्रयत्न असतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link