Next
बाबा कदम, सुरेश देशपांडे
BOI
Friday, May 04 | 03:45 AM
15 0 0
Share this story

बहुप्रसवा, वाचकप्रिय कादंबरीकार बाबा कदम आणि कोशकार सुरेश देशपांडे यांचा चार मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.......
वीरसेन आनंदराव कदम

चार मे १९२९ रोजी अक्कलकोटमध्ये जन्मलेले वीरसेन आनंदराव ऊर्फ ‘बाबा’ कदम हे अत्यंत लोकप्रिय आणि बहुप्रसवा कादंबरीकार आणि कथाकार होते. जवळपास सत्तर कादंबऱ्या, वीसहून जास्त कथासंग्रह त्यांच्या लेखणीतून उतरले आहेत. त्यांनी अध्यात्माविषयी लिखाणही केलं होतं.

पोलीस वकील म्हणून काम करत असताना त्यांनी मानवी स्वभावाचे अनेक पैलू बघितले आणि आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून ते प्रभावीपणे मांडले. त्यांच्या ‘भालू’सारख्या कादंबऱ्यांवर सिनेमेही बनले. 

आधार, अजिंक्य, इस्टेट मॅनेजर, बदला, भालू, निर्मला, पद्मजा, पिकनिक, प्रतीक्षा, राही, राजधानी, राजलक्ष्मी, सकीना, साकी, सन्ना, सरला यांसारखी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२० ऑक्टोबर २००९ रोजी त्यांचा कोल्हापूरमध्ये मृत्यू झाला.

(बाबा कदम यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

.....

सुरेश रघुनाथ देशपांडे 

चार मे १९३६ रोजी जन्मलेले सुरेश रघुनाथ ऊर्फ भैयासाहेब देशपांडे हे कोशकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी कोशवाङ्मयासाठी मोठं योदान दिलं आहे. मराठी विश्वकोशाचे ते सहसंपादक होते.

भारतीय कामशिल्प, भारतीय गणिका, सरस्वती दर्शन, मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

त्यांना १९८९ सालचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार मिळाला होता.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link