Next
पुण्याच्या ‘ईएलएमएनओपी’ला पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, April 26 | 05:01 PM
15 0 0
Share this story

'हडल' आशियाई स्टार्टअप परिषदेत पुरस्कार विजेते ‘ईएलएमएनओपी’चे संस्थापक संतोष तळघट्टी यांच्यासमवेत युनायटेड नेशन्स टेक्नोलॉजी इनोव्हेशन लॅबच्या प्रमुख डॅनी  डेन व अन्य मान्यवर

पुणे : गावखेड्यातील शाळांना ‘ग्लोबल क्लासरूम’च्या माध्यमातून इंटरनेटद्वारे जगाशी जोडून शिक्षणाचा दर्जा उंचावणाऱ्या पुण्यातील ‘इ-लर्निंग मीडिया नेटवर्क फॉर प्रोफेशनल्स’ (ईएलएमएनओपी ) या स्टार्टअपला ‘हडल’आशियाई स्टार्टअप परिषदेत पुरस्कार मिळाला आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी केरळ स्टार्टअप मिशन व इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने केरळमधील त्रिवेंद्रम येथे नुकतेच या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘ईएलएमएनओपी’ने देशातील पहिल्या दहा ‘स्टार्टअप’मध्ये येण्याचा मान मिळवला.

देशभरातून सहभागी झालेल्या दोन हजार उद्योजकांमध्ये ‘ईएलएमएनओपी’चे संस्थापक संतोष तळघट्टी यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. संयुक्त अरब अमिराती येथील शेख फहीम बिन सुल्तान अल कासिमी यांच्यासह आदी मान्यवर या परिषदेस उपस्थित होते. उद्योजक, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ञ यांनी परिषदेत सहभाग घेतला. 

‘ऑनलाईन परस्परसंवाद, व्यवस्थापन मॉडेल, ऑडिओ व्हिज्युअल लेक्चर्स, समस्या सोडवण्याची क्रिया आणि तज्ञ संवाद, शिक्षक सक्षमीकरण, इ-शिक्षण सत्र यातून एक जागतिक व्यासपीठ उभारू शकू आणि गावखेड्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकू’,असे मत संतोष तळघट्टी यांनी या वेळी व्यक्त केले. 

‘युनायटेड नेशन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन लॅब’च्या डॅनी डेन यांनी पहिल्या दहा विजेत्यांना भविष्यात स्टार्टअप उद्योगाच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या. 

‘सरकारकडून तंत्रज्ञान विषयक स्टार्टअपसाठी भविष्यात हातभार लावण्यात येणार आहे’, असे केरळचे आयटी सचिव एम. सिवासनकर यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link