Next
‘व्यंगचित्रकाराला सामाजिक भान हवे’
BOI
Monday, May 07 | 02:37 PM
15 0 0
Share this story

पुणे :  जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पाच मे रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माध्यम समन्वय कक्षातर्फे ‘शहरामधील नागरी प्रश्न’ या विषयावरील व्यंगचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रख्यात व्यंगचित्रकार सूरज श्रीराम ऊर्फ एस.के यांनी काम पाहिले. या वेळी अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी तसेच माध्यम आणि संज्ञापन विभागाचे विश्राम ढोले, माध्यम समन्वय विभागाचे विशेष कार्याधिकारी अभिजित घोरपडे उपस्थित होते.

वाहतूक व्यवस्था, कचरा, रस्ते, पोलिस, स्वच्छता, भ्रष्टाचार अशा विविध विषयांवरील व्यंगचित्रे येथे मांडण्यात आली होती.

‘व्यंगचित्रकार हा निव्वळ चित्रकार नसतो; तर तो एक वि़चारवंतही असतो. किंबहुना व्यंगचित्रांच्या माध्यमांमधून कोणत्याही व्यंगचित्रकाराचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच व्यक्त होत असतो’, असे मत या स्पर्धेचे परीक्षक व प्रख्यात व्यंगचित्रकार सूरज श्रीराम ऊर्फ एस.के यांनी व्यक्त केले. त्यांनी व्यंगचित्रांच्या प्रात्यक्षिकांसह उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी डॉ. उमराणी म्हणाले, ‘व्यंगचित्र ही अत्यंत निर्मितीक्षम कला आहे. कलांचा विकास हा स्वतंत्र वातावरणातच होतो. यामुळेच भारतामध्ये पारतंत्र्याचा काळ असताना कलांचा विकास वेगाने होऊ शकला नाही, मात्र  आता ही परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांच्या सक्षम विकासासाठी अशा कला महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे अशा विषयांचा अंतर्भाव हा विद्यापीठामधील अभ्यासक्रमामध्येही व्हावयास हवा.’

कार्यक्रमामध्ये अभिजित घोरपडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. उमराणी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पहिल्या क्रमांकाला पाच हजार रुपये आणि एस.के यांचे पुस्तक, दुसऱ्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये आणि एस.के यांचे पुस्तक, तिसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि एस.के यांचे पुस्तक, तर उत्तेजनार्थ म्हणून एस.के यांचे पुस्तक असे पुरस्कार देण्यात आले.

स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त विद्यार्थी
पहिला क्रमांक - शुभम खेडेकर (त्रिनिटी महाविद्यालय)
दुसरा क्रमांक - सुहास जानराव (जी.एच. रायसोनी कॉलेज)
तिसरा क्रमांक - वीणा मित्रा (डीएव्ही कॉलेज)
.
उत्तेजनार्थ पारितोषिके
अमोल कुंटला (तुलसियानी टेक्निकल कॅम्पस, कामशेत)
करुणा खरात (डी.वाय पाटील इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)
सायली खरात (डी.वाय पाटील इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link