Next
लिटल हार्ट्स मॅरेथॉनमध्ये धावली २७ हजार मुले
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 03:35 PM
15 0 0
Share this storyमुंबई : बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलतर्फे वांद्रे-कुर्ला संकुल येथे ‘लिटल हार्ट्स मॅरथॉन २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील २७ हजारांहून अधिक मुले सहभागी झाली होती. ही मॅरेथॉन २७ जानेवारीला झाली. या कार्यक्रमातून गोळा झालेल्या निधीचा उपयोग करून विविध हृदयविकारांनी त्रस्त असलेल्या मुलांना सवलतीतील खर्चात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या पूर्वी आयोजित केलेल्या पाच मॅरेथॉनच्या माध्यमातून गोळा झालेला निधी अद्ययावत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात आला. त्याचप्रमाणे उच्च दर्जाची उपकरणे आणि उत्तम डॉक्टरांची, प्रशिक्षित नर्सची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एक हजारहून अधिक मुलांचा जीव वाचविण्यास मदत झाली.

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम यांनी या मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवला. नगरसेवक तथा बोर्ड मेंबर दत्ता पोंगाडे, वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला आणि इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.दर वर्षी भारतात सुमारे एक लाख मुले मोठ्या किंवा गंभीर स्वरूपाच्या हृदयदोषासह (सीएचडी) जन्मतात. नवजात बालकांमधील हृदयदोषाची लक्षणे वयाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात सुरू होत असल्यामुळे अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या आजारांमध्ये व्यंग येण्याचे किंवा मृत्यू येण्याचे प्रमाण अधिक आहे. यासंदर्भात माहितीची कमतरता असल्यामुळे भारतातील नवजात बालकांच्या मृत्यूपैकी १० टक्के मृत्यूंना सीएचडी कारणीभूत असतो. एकट्या महाराष्ट्राचा विचार करता हृदय शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलांची संख्या ५०० हून अधिक आहे. त्याचप्रमाणे बैठ्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढू लागले आहे. याबद्दल मॅरेथॉनच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.

वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, ‘पहिल्या पर्वापासून सहाव्या पर्वापर्यंत या कार्यक्रमाचे स्वरूप मोठे झालेले पाहणे आनंददायी आहे. मुलांचा सहभाग वाढल्यामुळे या कार्यक्रमासंदर्भातील जागरूकताही वाढली आहे. बाल हृदयरुग्णांसाठी मुलांनीच धावणे हे प्रोत्साहन देणारे आहे. आजच्या घडील भारतात नवजात किंवा जन्मजात हृदयदोष असलेल्या बालकांवर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करणारी आणि वर्षाला सुमारे २०० शस्त्रक्रिया करणारी ५०हून कमी बाल हृदयचिकित्सा केंद्रे आहेत. यापैकी बहुतेक रुग्णालये व्यावसायिक स्तरावरील आहेत आणि सुमारे १० रुग्णालये सरकारी आहेत. एप्रिल २०१७मध्ये वाडिया हॉस्पिटलमधील हृदयचिकित्सा विभागाचे उद्घाटन झाले आणि या ठिकाणी करण्यात एक हजारहून अधिक शस्त्रक्रिया १०० टक्के यशस्वी झाल्या आहेत. हृदयदोष असलेल्या मुलांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या उत्साही मुलांमुळे हा उपक्रम इतका यशस्वी झाला आहे. वाडियामध्ये बाल हृदयविकार तज्ज्ञ, बाल हृदय शल्यविशारद आणि पिडिअॅट्रिक कार्डिअॅक इन्टेन्सिव्हिस्ट, अशी वैदकीय तज्ज्ञांची टीम आहे.’वाडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नेस वाडिया म्हणाले, ‘लिटिल हार्ट्स मॅरेथॉनची सहा पर्वे आणि बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयाच्या अविरत प्रयत्नांमुळे आतापर्यंत एक हजारहून अधिक मुलांच्या हृदयरोगावर उपचार करण्यात आले आहेत. वाडिया रुग्णालयात बाल हृदयचिकित्सा केंद्र स्थापन करणे, उच्च दर्जाची आणि अत्याधुनिक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित नर्सची नेमणूक पाहता बांधिलकी व मेहनतीमुळे किती मोठे काम होऊ शकते, हे दिसून येते. हृदय शस्त्रक्रियेची तातडीने आवश्यकता असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गटातील मुलांच्या उपचारांसाठीचा खर्च आणि वेळ या दोन्हीमध्ये कपात झाल्याचे पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. हे लक्षात घेत अजूनही खूप करण्याची गरज असल्याचे जाणवते. या समस्येसंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि निधी उभा करण्यासाठी लिटिल हार्ट्स मॅरेथॉन आयोजित करण्यात येते, जेणेकरून अशा अनेक मुलांवर उपचार करता येऊ शकतील.’

बॉलीवूड अभिनेते जॉन अब्राहम म्हणाले, ‘वाडियाच्या बाल हृदयचिकित्सा केंद्राचा अॅम्बेसेडर असल्याबद्दल मला अत्यंत आनंद होतो. या हॉस्पिटलतर्फे सहावी लिटल हार्ट्स मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. लहान वयातच सुदृढ आरोग्य आणि व्यायामाचा प्रसार करणे ही काळाची गरज आहे. लहान मुलांच्या हृदयरोगासंदर्भात जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंध करणे आणि उपचार करण्याबाबत वाडिया हॉस्पिटल उद्गाते आहेत. या सत्कार्यासाठी मी या टीमला मनापासून शुभेच्छा देतो.’विजेत्या स्पर्धकांची नावे अशी : डिलाइट रन पाच किमी मुले– महादेव कुंभार (प्रथम), तेजस पवार (तृतीय), सिद्धेश थोरात (तृतीय). मुली– आंचल राजपूत (प्रथम), आरती यादव (द्वितीय), जसलीन वर्गीस (तृतीय). ड्रिम रन २.५ किमी मुले– कृपा यादव (प्रथम), सुमित कनोजिया (द्वितीय), विकास राजभर (तृतीय). मुली- परीना खिलारी (प्रथम), सरीता पटेल (द्वितीय), तन्वी शिंदे (तृतीय). विष रन एक किमी मुले- वरद पाटील (प्रथम), रूद्र उदेशी (द्वितीय). मुली- साराह राणे (प्रथम), आर्या पोल (द्वितीय).
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link