Next
लिहा तुमची ‘गावगाथा’
तुमच्या गावाची कहाणी सांगा तुमच्याच शब्दांत!
BOI
Friday, August 31 | 02:53 PM
15 1 0
Share this story


आपलं गाव हा प्रत्येकाच्याच विशेष जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकालाच आपला गाव प्रिय असतो, मग ते छोटेसे खेडे असो अथवा एखादे मोठे शहर. त्या गावाशी आपले नाते अतूट असते. महाराष्ट्रातल्या गावांसंबंधीचे लेखन संकलित करण्याच्या उद्देशाने ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलने ‘गावगाथा’ ही एक अभिनव लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.  

यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या गावाबद्दल लिहायचे आहे. मग ते एखादे छोटे गाव असो अथवा शहर. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’कडे येणाऱ्या एकूण लेखांमधून तीन उत्कृष्ट लेखांची निवड करण्यात येईल. त्या लेखांना अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन हजार रुपये व एक हजार रुपये असे पारितोषिक दिले जाईल. याखेरीज जे लेख वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यासाठी निवडले जातील, त्या प्रत्येक लेखासाठी पाचशे रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

काय आहे ‘गावगाथा’ची संकल्पना?
‘गाव’ या संकल्पनेमध्ये मुंबईसारख्या महानगरापासून स्थायी स्वरूपाच्या वाडी-वस्तीपर्यंत सर्व तऱ्हेच्या ग्राम प्रकारांचा समावेश होतो. त्यामुळे वाचकांनी त्यांच्या, त्यांना ममत्व वाटणाऱ्या गावाबद्दल मोकळेपणाने लिहायचे आहे. हा लेख १००० ते १२०० शब्दांत असावा. लेखनात गावाच्या वर्णनासोबत गावाचा भूगोल, इतिहास, ग्रामदेवता, गावाच्या परंपरा, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, तेथील मानवी कर्तबगारी आणि संस्थात्मक कामे या घटकांचा उल्लेख अवश्य असावा. यासाठी नमुना म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेब पोर्टलवर ‘गावगाथा’ या सदरात काही गावांची माहिती दिलेली आहे. ती वर्णने आदर्श व माहितीपूर्वक असतीलच असे नाही. तो केवळ नमुना आहे.

इच्छुक व्यक्तींनी त्यांचे लेख १० सप्टेंबर २०१८पर्यंत ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’कडे पाठवायचे आहेत. हे लेख हस्तलिखित स्वरूपात असल्यास पोस्टाद्वारे अथवा संगणकावर टाईप केलेले असल्यास ई-मेलने पाठवता येतील.

संपर्कासाठी पत्ता :
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’, २२ मनुबर मॅन्शन, पहिला मजला, १९३ आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई ४०००१४
फोन : ९८९२६ ११७६७, ०२२-२४१८३७१०, ०२२-२४१३१००९ 
ई-मेल : info@thinkmaharashtra.com
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
धोंडपा नंदे About 138 Days ago
अतिशय सुंदर सकल्पना मीअवश्य भाग घेऊन माझ्या गावा बदल लिहीन धन्यवाद व शुभेच्छा..थिंक महाराष्ट्र ठिमला
0
0
शिरीष गंधे About 138 Days ago
सन. आपण हाती घेतलेला प्रकल्प अत्यंत स्तुत्य आहे.मी सहभागी होत आहे. कळावे,लोभ आहेच. शिरीष गंधे.
0
0

Select Language
Share Link