Next
खेळिया काव्यसंग्रह आणि ‘मु. पो. आई’ या पुस्तकांचे प्रकाशन
BOI
Saturday, October 13, 2018 | 11:26 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : नामवंत कवी बा. भ. बोरकर यांचे पुतणे डॉ. घनश्याम बोरकर यांनी लिहिलेल्या ‘खेळिया’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन १४ ऑक्टोबर २०१८ रोजी होणार आहे. तसेच, ‘मु. पो. आई : संपादकांचं मातृस्मरण’ या पुस्तकाचे प्रकाशन २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन मुंबईत होणार असून, दोन्ही पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित होणार आहेत. 

‘खेळिया’च्या प्रकाशनासंबंधी :
डॉ. घनश्याम बोरकर यांच्या ‘खेळिया’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून, ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. प्रा. शिरीष गोपाळ देशपांडे हे या कार्यक्रमाचे सन्माननीय वक्ते असतील. प्रकाशन सोहळा १४ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असून, ‘खेळिया काव्यमैफल’ झाल्यानंतर प्रकाशन होणार आहे. 

कार्यक्रम : खेळिया काव्यसंग्रहाचे प्रकाशन
वेळ : १४ ऑक्टोबर २०१८, सायंकाळी पाच वाजता
स्थळ : दादर माटुंगा कल्चरल सेंटर, १२२, ए. जे. के. सावंत मार्ग, मुंबई ग्लास वर्क्सच्या समोर, माहीम, मुंबई - १६
.............
‘मु. पो. आई’च्या प्रकाशनासंबंधी :
‘मु. पो. आई : संपादकांचं मातृस्मरण’ हे पुस्तक पत्रकार संदीप रामराव काळे यांनी संपादित केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, श्रीराम पवार, अभिनंदन थोरात या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  

कार्यक्रम : ‘मु. पो. आई : संपादकांचे मातृस्मरण’ पुस्तकाचे प्रकाशन
वेळ : २३ ऑक्टोबर २०१८. सायंकाळी ५.४५ वाजता.
स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई - २१

या दोन्ही कार्यक्रमांना रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी केले आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search