Next
मुंबईत रंगणार ‘मुंबई कॉमिक कॉन’ सोहळा
२२-२३ डिसेंबरला बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, December 20, 2018 | 02:42 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील सर्वात मोठा पॉप कल्चर सोहळा ‘मुंबई कॉमिक कॉन’ २२ आणि २३ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये रंगणार आहे. पॉप कल्चर आणि फॅन्टास्टिशी निगडीत सर्व वस्तूंनी आणि विविध कार्यक्रमांनी भरलेल्या या सोहळ्यात उपस्थितांना कॉमिक्स आणि ग्राफिक्सचा अनुभव घेता येणार आहे.

यात लोकप्रिय नावे आणि मालिकांबरोबरच प्रतिभावंत कलाकारांच्या व लेखकांच्या उत्कृष्ट कलाकृतींचादेखील समावेश आहे. शिवाय चाहत्यांना खास अशा अनुभवात्मक आणि गेमिंग झोन्सचा, त्यांच्या आवडत्या ब्रॅंड्सच्या वस्तू आणि खेळणी यांचाही आनंद घेता येईल. ‘मुंबई कॉमिक कॉन २०१८’मधील विशेष अतिथींमध्ये देश-विदेशातील कॉमिक आणि मनोरंजन क्षेत्रातील नामवंत कलाकारांचा समावेश असेल.

या समारंभात मॉन्स्ट्रेस या फॅंटसी मालिकेसाठी प्रसिद्ध कलाकार सना ताकिडा, व्यावसायिक कॉस्प्लेअर याया हान, मार्व्हेल आणि डीसी कॉमिक्सचा कलाकार विल कॉनरॅड, तसेच भारतीय प्रकाशन वर्तुळातील लोकप्रिय कॉमिक बुक कलाकार विवेक गोयल, सौमिन पटेल, अभिजीत किणी, एलिसिया सूझा, राहील मोहसीन आणि अनिरुद्धो चक्रवर्ती आदी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विनोदाचा आनंद सामील करण्यासाठी लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आणि ईस्ट इंडिया कॉमेडीचा सह-संस्थापक साहिल शाह अॅक्ट सादर करणार असून, रॉक ऑन आणि सॅकरेड गेम्ससाठी ओळखला जाणारा लुक केनी याचे एक रंजक सत्र ‘मुंबई कॉमिक कॉन’मध्ये असेल.

‘कॉमिक कॉन इंडिया’चे संस्थापक जतिन वर्मा म्हणाले, ‘पॉप कल्चर चाहत्यांसाठी आणि या शहरातील उत्साही लोकांसाठी हा वीकएंड वर्षातला सर्वांत मस्त वीकएंड असेल. दर वर्षीप्रमाणे, यंदाही या इव्हेंटमध्ये खूप छान अनुभव, अॅक्टिव्हिटीज आणि या उद्योगातील उत्तमोत्तम कलाकारांशी चर्चा, गप्पा अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. शिवाय कॉमिक बुक्सच्या अद्भुत विश्वाशी निगडीत असलेले मोठमोठे कलाकार, चित्रकार, लेखक आणि प्रकाशक यांच्याशी मनमोकळ्या गप्पा आणि पॅनल चर्चादेखील यात असणार आहे.’

‘कॉमिक कॉन’चा कोणताही अनुभव अत्यंत क्रिएटिव्ह अशा कॉस्प्लेच्या हुबेहूब सादरी करणाशिवाय अपूर्ण असतो, अनेक चाहते कॉमिक बुक्स, चित्रपट, टीव्ही शो आणि गेम्समधल्या आपल्या आवडत्या कॅरेक्टरसारखी वेशभूषा करण्याची संधी आनंदाने घेत असतात. सर्वात छान आणि व्यवस्थित डिझाइन केलेली वेशभूषा परिधान करणाऱ्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. दोन्ही दिवशी एका भाग्यवान विजेत्याला ५० हजारांचे रोख बक्षीसदेखील दिले जाणार आहे. हे विजेते ‘इंडियन कॉस्प्ले चॅम्पियनशिप २०१९’मध्ये दाखल होऊन शिकागोमधील ‘क्राउन वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ कॉस्प्ले’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

‘मुंबई कॉमिक कॉन’विषयी :
दिवस :
२२ आणि २३ डिसेंबर २०१८
वेळ : सकाळी ११ ते रात्री आठ
स्थळ : बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को, गोरेगाव, मुंबई
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link