Next
‘एमयू’तील विद्यार्थ्यांकडून निवासी जागांना मागणी
प्रेस रिलीज
Tuesday, September 04, 2018 | 03:23 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : नुकतेच पदवी संपादन केलेले सहा लाखांहून अधिक विद्यार्थी यंदा मुंबई विद्यापीठात (एमयू) दाखल होणार आहेत. देशातील विविध भागांतून विद्यार्थी मोठ्या संख्येने मुंबईत येणार आहे. महाविद्यालयांतील मर्यादित होस्टेल सुविधा बघता, हे विद्यार्थी सातत्याने पीजी, हॉस्टेल किंवा फ्लॅटच्या शोधात असतात आणि मुंबईसारख्या शहरात राहणे अत्यंत महाग असल्याने हे काम खूपच कठीण ठरू शकते.

अन्य राज्यांतील विद्यापीठे एकाच ठिकाणी आहेत; मात्र मुंबई विद्यापीठ एका ठिकाणापुरते मर्यादित नाही. या विद्यापीठाची केंद्रे केवळ मुंबई शहरातच नव्हे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील चार जिल्ह्यांत पसरली आहेत. ७००हून अधिक संलग्न महाविद्यालयांमुळे मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वांत मोठ्या विद्यापीठांमधील एक आहे.

‘पश्चिम आणि दक्षिण मुंबईमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने राहतात. यावर्षी पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात रस दाखवला आहे. पीजी, एकत्र राहण्याच्या जागा (को-लिव्हिंग स्पेसेस) आणि १-२ बीएचके फ्लॅट्सना बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांमधून सहसा खूप मागणी असते. उपनगरांतील अंधेरी, वांद्रे आणि मुलुंड येथे परवडण्याजोग्या किंमतीत घरे उपलब्ध असल्याने ती विद्यार्थ्यांसाठी राहण्याची प्रमुख ठिकाणे आहेत,’ असे इंडिया प्रॉपर्टी होम्स या मुंबईस्थित मालमत्ता सल्लागार संस्थेचे मालक आदित्य राठोड सांगतात.

‘आमच्याकडे होणाऱ्या निम्म्या चौकशा ओएलएक्ससारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सद्वारे होतात. स्मार्टफोन वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅपमार्फत आमच्यापर्यंत पोहोचणे सोपे वाटते. या अॅपवर भाड्यापोटी देण्याजोग्या जागांचे सर्व तपशील तसेच फोटोही त्यांना बघता येतात,’ असे राठोड म्हणाले.

ओएलएक्स इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आयर्विन प्रीतसिंग आनंद म्हणाले, ‘भारतामध्ये सुमारे २० दशलक्ष विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी बेंगळुरू, दिल्ली राजधानी परिसर, मुंबई, पुणे आणि हैदराबाद यांसारख्या महानगरांत येतात. महाविद्यालयातील निवासाच्या सुविधा यापैकी फार थोड्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतात. म्हणूनच निवासी जागांना विद्यार्थ्यांमधून होणाऱ्या घराच्या मागणीचा लाभ घेण्याची उत्तम संधी आहे. गेल्या तिमाहीत आपण असे बघितले की, पीजी/मध्यम आकारमानाच्या टू किंवा थ्री बीएचके फ्लॅट्सना विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होती. गेल्या तिमाहीत यादीमध्ये ५० टक्के, तर खरेदीदारांच्या संख्येत ७० टक्क्याने वाढ झाली आहे.’

‘दिल्ली, बेंगळुरू, मुंबई यांसारख्या महागनरांतील बाजारपेठा या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगाने वाढत आहेत. या शहरांतील निवासी जागा विभागाने विद्यार्थ्यांसाठी राहण्याच्या सुविधा खुल्या केल्या आहेत. महाविद्यालयाच्या आवारात त्यांना कदाचित मिळू शकणार नाहीत, अशा उत्तम सुविधा त्यांना येथे दिल्या जात आहेत,’ असे आनंद म्हणाले.

रीअल इस्टेट हा ओएलएक्सवरील लोकप्रिय विभाग आहे. या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या पाच वापरकर्त्यांपैकी एक या विभागाला भेट देतो, यावरून ग्राहकांचा ऑनलाइन मालमत्ता खरेदी-विक्रीतील तसेच भाड्याने देण्या-घेण्यातील रस वाढला आहे हे दिसून येते. ओएलएक्सवरील रीअल इस्टेट विभागाला दर महिन्याला १.२ अब्जांहून अधिक पेज व्ह्यूज असतात. आत्तापर्यंत, मालमत्तेच्या विभागात ३ लाख ५० हजार प्रत्यक्ष लिस्टिंग्ज झाली असून, यातील एक लाख २० हजार पीजी, अपार्टमेंट्स, डॉर्म आदी भाड्याच्या जागांसाठी आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search