Next
‘अलिबाग हे एकमेवाद्वितीय पर्यटनस्थळ’
BOI
Wednesday, December 27 | 05:55 PM
15 0 0
Share this story

अलिबाग : ‘अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे स्थान आहे. येथे प्रत्येक गोष्ट पर्यटन केंद्रीत आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्र किनारा असे एकमेवाद्वितीय पर्यटन स्थळ आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्त्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करू,’ असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी येथे केले.

अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अलिबाग नगरपालिका व महिला बचत गट फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित ‘अलिबाग महोत्सव २०१७’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, महिला बचत गट फेडरेशनच्या चित्रेलखा पाटील, अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

रावल म्हणाले की, ‘अलिबागला पर्यटनाच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. यासाठी पर्यटन क्षमतेचा विकास करणे आवश्यक आहे. पर्यटन हे सर्वांत मोठे रोजगाराचे साधन आहे. अलिबागसारख्या पर्यटनस्थळी पर्यटन हेच रोजगाराचे मुख्य स्त्रोत आहे. वेगवेगळ्या विभागात पर्यटन विभागले आहे. शासन किल्ले संवर्धन हे नवीन धोरण आणत आहे. रायगड किल्ल्याला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी शासनाने ६०६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केले आहे. २०१८मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळी लाईट शो; तसेच अलिबाग समुद्रकिनारी पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन विभाग आवश्यक ती सर्व मदत करेल; परंतु हे सर्व करत असताना नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखले पाहिजे.’

या वेळी आमदार पाटील म्हणाले की, ‘रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन विभागाने आवश्यक ते सहकार्य करावे. अलिबागाचे नाव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर न्यायचे आहे. पर्यटनामुळे रायगड जिल्ह्यातील जनतेला रोजगार उपलब्ध होऊन पर्यटनाला चालना मिळेल.’

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी केले. सुरक्षा शहा यांनी मान्यवरांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link