Next
तांदळाच्या दाण्याएवढ्या आकारातले चित्र
प्रेस रिलीज
Wednesday, November 01 | 06:52 PM
15 0 0
Share this story

पुणे : अंगठ्याच्या नखावर बोटांनी हळुवार रंगभरण करीत तांदुळाच्या एका दाण्याच्या आकाराच्या कॅनव्हासवर काश्मीरचे सौंदर्य रेखाटण्याचा विक्रम सोपान खंडागळे या अवलिया चित्रकाराने केला आहे. सर्वात लहान चित्र म्हणून  त्याच्या या विक्रमाची नोंद भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. 

घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील राजा रवी वर्मा कलादालनात जयहिंद परिवार आणि लाईफस्टार ग्लोबल रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित कलाकार राष्ट्रीय संमेलनात  खंडागळे यांनी प्रात्यक्षिक केले. त्यावेळी त्यांच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली. 
कला क्षेत्रातील मुकेश कणेरी यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी  जयहिंद परिवाराचे नारायण फड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कलाकार राष्ट्रीय संमेलनात सोपान खंडागळे यांना मुकेश कणेरी यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी  जयहिंद परिवाराचे नारायण फड व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सोपान खंडागळे हे बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातल्या निमगावचे असून, नोकरीनिमित्त ते सध्या सुरतमध्ये स्थायिक आहेत. पेंटिंग करणे त्यांचा आवडता छंद असून, त्यांनी तो जिद्दीने जपला आहे. या वेळी सोपान खंडागळे म्हणाले, ‘ज्येष्ठ कलाकार इफ्तीकर अहमद राजा यांचे ८-१० वर्षांपूर्वी मी चित्र पहिले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी हा फिंगरआर्ट कलेचा छंद जोपासला आहे. जागतिक विक्रम करणे हे माझे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे. यातूनच आता उपजीविकेचा मार्ग शोधणार आहे. आतापर्यंत बेटी बचाव, स्वच्छता अभियान आदी संकल्पनांवर चित्रे रेखाटली आहेत. यापुढे ही कला अधिक जोमाने जपण्याचा माझा प्रयत्न आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link