Next
उद्योजकता विकासासाठी बीव्हीजी-डिक्की एकत्र
BOI
Monday, April 29, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this article:


पुणे : शेतकऱ्यांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी ‘बीव्हीजी उद्योग समूह’ आणि ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ (डिक्की) एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिली.

बीव्हीजी लाइफ सायन्सेसतर्फे आयोजित खरीप नियोजन शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी बीव्हीजी समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, हास्य क्लबचे मकरंद टिल्लू, विश्वशांती इंटरनॅशनल फाउंडेशनचे डॉ. दत्ता कोहिनकर, वसंत हणकारे, प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते.

‘विषमुक्त शेतमाल विक्रीची बाजारपेठ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशी बाजारपेठेत भारतीय विषमुक्त शेतमालास मोठी मागणी आहे. मात्र, त्याच वेळी रासायनिक शेतीत अतिरिक्त उत्पादनाचा अट्टाहास टाळून उत्पादित केलेल्या शेतमालास देशांतर्गत बाजारपेठ मिळवून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बीव्हीजी लाइफ सायन्सेस प्रयत्नशील आहे. सध्याच्या हवामान बदलाच्या काळात बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाने शेतकरी टिकवला आहे,’ असे मत कांबळे यांनी या वेळी व्यक्त केले.

‘शेतीवरचा खर्च कमी केलाच पाहिजे. जास्त उत्पादन मिळवण्याच्या आशेने रासायनिक खतांचा होणारा अतिरिक्त वापर शेती आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे; म्हणून सर्वांनी विषमुक्त शेतीस प्राधान्य द्यावे,’ असे गायकवाड यांनी सांगितले.

या कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी मार्गदर्शन केले. गणेश लिमये यांनी स्वागत केले. स्मिता पोफळे यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
संतोष दाभाडे About 167 Days ago
खुप सुंदर संकल्पना आहे आज सर्व नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने लागवड करावी कांबळे सरांनी केलेली सुरू वात खुप अभिनंदनीय आहे खुप खुप शुभेच्छा अभिनंदन
0
0
Santosh Daulatrao Dabhade About 167 Days ago
Very nice consept in this need for all peoples in India organic products
0
0
Shweta vipul Kshirsagar About 170 Days ago
We are interested in this project. So contact me Mobile number. 9892574347
0
0

Select Language
Share Link
 
Search