Next
पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
BOI
Saturday, February 23, 2019 | 04:59 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २२ फेब्रुवारी २०१९ रोजी उत्साहात साजरे करण्यात आले. या वेळी विद्यार्थांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थांनी आपली कला सादर केली. या वेळी विद्यार्थांनी आपल्या सादरीकरणातून देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. लावणी, समहूगायन, लघुनाट्य व संगीत नृत्य या वेळी सादर करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत सुरू झालेल्या या कार्यक्रमाला रोपळेसह बाभूळगाव, आढीव, मेंढापूर, परीते, तुंगत, येवती, खरातवाडी येथील शिक्षणप्रेमी आले होते.



सातवीतील विद्यार्थांनी आपल्या नाटकातून पब्जी गेमचे वेड लागल्यामुळे होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले. त्या नाटकाला प्रेक्षकांची विषेश दाद मिळाली. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॅडी सदस्य बाळासाहेब पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. एम. बागल व पर्यवेक्षक डी. एम. गणपाटील यांनी ग्रामस्थांचे स्वागत केले. या वेळी बोलताना मुख्याध्यापक बागल यांनी या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थांमध्ये दडलेला कलाकार सापडला असून, त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पर्यवेक्षक गणपाटील यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थी उत्तम कलाकारही असल्याचे या स्नेहसंमेलनातून समजल्यामुळे निश्चितच त्यांच्या कलेचा विकास करण्याची जबाबदारी आम्हाला पार पाडावी लागणार असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपिक श्रीमती समर्थ, सोमनाथ जगताप, संतोष रोकडे, कल्लेश्वर पानसांडे, एस. बी. राऊत, शिक्षक चंद्रकांत मलपे.  श्री . कोळी, व्ही. एस वाडेकर, ए. एस. कंदले, एम. एन. लंकेश्वर, टी. टी. ननवरे, एन. जी. वाघमारे, आर. ए. व्यवहारे, दत्तात्रय गोडे, बी. एम. पूजारी, वैभव भाग्यवंत, एस. एस. घोरपडे, अतुल भोसले, प्रदीप भोसले आदींनी प्रयत्न केले.

(पाटील विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search