Next
विषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड
सोलापुरातील शेतकऱ्यांचा उपक्रम
BOI
Friday, February 15, 2019 | 01:13 PM
15 1 0
Share this article:सोलापूर :
विषमुक्त अर्थात रासायनिक अंशविरहित शेतीमालाच्या विक्रीसाठी सोलापुरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘अमृत नॅचरल’ हा ब्रँड तयार केला आहे. केवड (ता. माढा) येथील महारुद्र लटके यांच्या द्राक्षबागेत पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी २०१९ रोजी ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनावेळी लटके यांच्या बागेतील द्राक्षे चांगल्या दराने विकली गेली. 

कोणतीही रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके किंवा रासायनिक बुरशीनाशके न वापरता केवळ नैसर्गिक घटकांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीतून उत्पादित होणाऱ्या शेतीमालामध्ये विषारी रसायनांचा अंश नसतो. त्यामुळे अशा शेतीमालाला विषमुक्त किंवा रासायनिक अंशविरहित शेतीमाल असे म्हणतात. रसायनांच्या बेसुमार वापरातून तयार होणाऱ्या शेतीमालामुळे होणारे दुष्परिणाम दिसू लागल्याने अलीकडे विषमुक्त शेतीमालाला असलेली मागणी वाढू लागली आहे. या शेतीमालाची किंमत तुलनेने जास्त असली, तरीही त्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर आणि निसर्गावरही होत नाहीत. त्यामुळे असा शेतीमाल लोकप्रिय होऊ लागला आहे. याची दखल घेऊन ग्राहकांना खात्रीशीर, दर्जेदार विषमुक्त शेतीमाल उपलब्ध व्हावा, यासाठी सोलापूरच्या माढा आणि पंढरपूर तालुक्यातील काही शेतकरी एकत्र आले. विषमुक्त गो आधारित, शाश्वत शेती करणाऱ्या शेतकरी गटामार्फत या ‘अमृत नॅचरल’ ब्रँडची सुरुवात झाली. 

शेतकऱ्यांनी पिकविलेला विषमुक्त शेतीमाल या ब्रँडद्वारे देशात, तसेच देशाबाहेरील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ब्रँडचे उद्घाटन या गटांचे संस्थापक अध्यक्ष पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आले. केवड (ता. माढा) येथील शेतकरी महारुद्र लटके यांच्या बागेतील विषमुक्त द्राक्षे उद्घाटनादिवशी अमृत नॅचरल या ब्रँडने विकली गेली. द्राक्षांना शेतावर प्रतिकिलो ६० रुपये दर मिळाला. ‘हा दर चालू बाजारभावापेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे हा ब्रँड शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोलाचा ठरणार आहे,’ गोमाता विषमुक्त शेतीमाल उत्पादक संघाचे मार्गदर्शक आणि आणि शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी भारत रानरुई यांनी सांगितले. 

‘शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून पिकविलेल्या विषमुक्त शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी आम्ही ‘अमृत नॅचरल’ या ब्रँडची सुरुवात केली आहे. याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होऊ लागला आहे,’ असे पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी सांगितले. 

‘विषमुक्त शेतीमालाला देश-विदेशात चांगली मागणी आहे. त्यामुळे अमृत नॅचरल ब्रँडचा शेतकऱ्यांना चागला उपयोग होणार आहे. शेतीमालाला चांगले पैसे मिळू लागले, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होणार आहे,’ असे ब्रँडचे प्रवर्तक केशव राहेगावकर यांनी सांगितले. 

‘विषमुक्त शेतीमालाच्या विक्रीसाठी आम्हा शेतकऱ्यांना अमृत नॅचरल हा ब्रँड आशेचा किरण ठरणार आहे ,’ असे गोमाता संघाचे डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.या वेळी श्रीपाद कुलकर्णी, व्यापारी जयलक्ष्मी, एबीवाय फार्मर एलएलपी कंपनीच्या ब्लेसी, नंदकुमार पुजारी, प्रणव सरखोत, शेतकरी सुभाष लटके, महारुद्र लटके, भीमराव लटके, किशोर कुंभारे, लक्ष्मणराव सिडणकर, हरिश्चंद्र सुद्रीक, राजेंद्र लिगडे, नामदेव पासले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला लातूर, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यातील शेतकरी आणि मुंबई, हैदराबाद व कोइमतूर येथील विषमुक्त शेतीमालाचे काही खरेदीदार आले होते.

(सेंद्रिय शेतीमाल आणि देशी गायीच्या दुग्धोत्पादनाची एक यशोगाथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. नानासाहेब कदम यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 108 Days ago
It would have been more informative details of the varieties of the products were mentioned .
0
0
Bal Gramopadhye About 108 Days ago
It would have been more informative details of the varieties of the products were mentioned .
0
0
Parmeshwar Mali About 140 Days ago
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून पिकविलेल्या विषमुक्त शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी ‘अमृत नॅचरल’ या ब्रँडची जी सुरुवात झाली, ती खरोखर आपल्या शेतकरी मित्रांसाठी आशेचा किरण ठरेल.
0
0
Laxman sidankar About 157 Days ago
खुप खुप शुभेच्छा अमृत नॅचरल सर्व गृप मेंबर्स
1
0
निगडे राजेंद्र फलटण About 157 Days ago
खुप छान उपक्रम आहे विषमुक्त शेतीमालासाठी बाजारपेठ उपलब्ध या अम्रुत नेचरल या ब्रँड ने उपलब्ध केली असल्यामुळे शेतकर्‍यांना खुप फायदा होईल असे मला वाटते.
2
0

Select Language
Share Link
 
Search