Next
‘१६ मार्चपासून प्रस्ताव मागविणार’
प्रेस रिलीज
Friday, March 09 | 04:30 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘इम्प्रिंट-II’ इंडिया कार्यक्रमांतर्गत एक हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली आहे,’ अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

येथे आयोजित विझीटर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. मनुष्यबळ विकास मंत्रालय तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या निधींची निर्मिती केली असून, त्यात इतर इच्छुक उद्योग आणि मंत्रालयांनाही समाविष्ट करून घेतले जाणार आहे.

‘इम्प्रिंट-II’साठी १६ मार्च २०१८पासून प्रस्ताव मागवले जाणार असून, येत्या मे महिन्यापर्यंत त्यांना मंजुरी देण्यात येईल. ‘इम्प्रिंट-I’ कार्यक्रमांतर्गत ३१८ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या १४२ प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे.

‘आयआयटी खडपूरचे प्राध्यापक इंद्रनील मन्न हे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम करतील. संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, शाश्वत निवास, आरोग्य सुविधा, नॅनो तंत्रज्ञान अशा विषयांवर या प्रकल्पांतर्गत संशोधन सुरू आहे. हे सर्व प्रकल्प प्रकाशित केले जाणार असून, त्यांना पेटंटही दिले जाणार आहेत,’ असे ते म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link