Next
इंडियाआर्ट गॅलरीतर्फे ‘द हेरिटेज कलेक्शन’ प्रदर्शन
प्रेस रिलीज
Thursday, April 19 | 03:33 PM
15 0 0
Share this story


पुणे : इंडियाआर्ट गॅलरीतर्फे जागतिक वारसा दिनाच्या औचित्याने ‘द हेरिटेज कलेक्शन प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. १८ एप्रिलपासून सुरू झालेले हे प्रदर्शन १८ मे पर्यंत चालणार असून, ते सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू असेल. हे प्रदर्शन विनामूल्य असून, ते भोसलेनगर येथील इंडियाआर्ट गॅलरीमध्ये भरले   आहे.
 
या प्रदर्शनाची संकल्पना इंडियाआर्ट गॅलरीचे संस्थापक आणि संचालक मिलिंद साठे यांची आहे.  हेरिटेज थीमवर आधारित असलेल्या या प्रदर्शनात नातूभाई मिस्त्री, यशवंत शिरवाडकर व  चित्रा वैद्य या ज्येष्ठ कलाकारांनी काढलेल्या  चित्रांसह आर्किटेक्ट वाय.डी. पिटकर आणि मिलिंद साठे यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. 
 
आपल्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल रोजी ‘जागतिक वारसा दिन’ साजरा केला जातो. यंदा ‘हेरिटेज फॉर जनरेशन्स’ अशी संकल्पना आहे. त्यावर आधारीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनात यशवंत शिरवाडकर यांची काश्मीर, मुंबई, राजस्थान आणि बनारस यांमधील विशेषता दर्शविणारी तैलचित्रे, नातू मिस्त्री यांची राजस्थान आणि गुजरातमधील खासियत दर्शविणारी कॅनव्हास पेंटिंग्ज आहेत. चित्रा वैद्य यांनी भीमबेटका, मध्य प्रदेश येथील रॉक टेक्श्चर्स  आणि रॉक आर्टवर आधारित तैलचित्रे रेखाटली आहेत. गुजरातमधील पाटण येथील क्वीन्स स्टेपवेल आणि मोढेरा येथील सूर्य मंदिराची छायाचित्रे आर्किटेक्ट वाय.डी. पिटकर यांनी घेतलेली आहेत. तर मिलिंद साठे यांची मध्य प्रदेशमधील भीमबेटका येथील रॉक आर्टवर आधारित छायाचित्रे आहेत. 
इंडियाआर्ट गॅलरीमधल्या या प्रदर्शनाव्यतिरिक्त हे प्रदर्शन www.indiaart.com वर ऑनलाईन देखील पाहायला मिळणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link