Next
‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल’ व ‘सारस्वत’ची भागीदारी
प्रेस रिलीज
Wednesday, September 19, 2018 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेली आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि शतकाहून जुनी व भारतातील सर्वात मोठी शहरी सहकारी बँक सारस्वत सहकारी बँक (सारस्वत बँक) यांनी संरक्षणापासून संपत्तीनिर्मितीपर्यंत विविध आयुर्विमा उत्पादने उपलब्ध करण्यासाठी सहयोग केला आहे.

या भागीदारीद्वारे, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश व कर्नाटक येथील सारस्वत बँकेच्या अंदाजे २८० शाखा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफची सर्व संरक्षण व बचत उत्पादने उपलब्ध करणार आहेत. काही प्रमुख संरक्षण उत्पादनांमध्ये ३४ गंभीर आजारांपासून संरक्षण देणारा पहिलावहिला टर्म प्लान आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट व विविध प्रकारचे हृदयाचे रोग व कॅन्सर यांचा समावेश करणारा हेल्थ इन्शुरन्स प्लान आयसीआयसीआय प्रु हार्ट, कॅन्सर प्रोटेक्ट यांचा समावेश आहे. ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मदत करतील, अशा दीर्घकालीन बचत उत्पादनांमध्ये आयसीआयसीआय प्रु फ्युचर पर्फेक्ट, आयसीआयसीआय प्रु सेव्हिंग्स सुरक्षा व आयसीआयसीआय प्रु कॅश अॅडव्हांटेज यांचा समावेश आहे.

सारस्वत सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता सांधणे म्हणाल्या, ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफबरोबर हा सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. या सहयोगामुळे आम्हाला ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची, तसेच त्यांच्या संरक्षण व बचतीच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी आयुर्विमा उत्पादने देणे शक्य होणार आहे. ग्राहक-केंद्रितता दोन्ही कंपन्यांच्या मूलभूत विचारांच्या केंद्रस्थानी असल्याने, हा सहयोग परस्परांना फायदेशीर ठरणार आहे आणि आम्ही आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफबरोबर काम करण्यासाठी इच्छुक आहोत.’

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. कन्नन म्हणाले, ‘बँकिंग क्षेत्रामध्ये १०० वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेल्या सारस्वत सहकारी बँकेशी भागीदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्या ग्राहक-केंद्री उत्पादनांमुळे बँकेच्या ग्राहकांना जीवनातील अनिश्चितता हाताळण्यासाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षेची तरतूद करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.’

‘आमच्या बचत उत्पादनांमुळे त्यांना दीर्घकाळात प्रभावीपणे संपत्तीसंचय करण्याची संधी मिळणार आहे. आमच्या डिजिटल सुविधेमार्फत, आम्ही पेपरलेस ऑन-बोर्डिंग ही सुविधा व ग्राहकांना दर्जेदार सेवा देऊ शकणार आहोत. या भागीदारीमुळे, आम्हाला बँकेच्या फ्रेंचाइजीचे मूल्य वाढवण्यासाठी मदत करणे, तसेच आमचे मल्टि-चॅनल वितरण जाळे सक्षम करणे शक्य होणार आहे,’ असे कन्नन यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search