Next
‘जेएम’ एनसीडी विक्रीला २८ मेपासून सुरुवात
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 05:50 PM
15 0 0
Share this storyमुंबई : जेएम फिनान्शिअल क्रेडीट सोल्यूशन्स लिमिटेड (कंपनी) या रिअल इस्टेट डेव्हलपर्सना एकात्मिक वित्तीय सेवा देणाऱ्या जेएम फिनान्शिअल समूहाच्या एनबीएफसी कंपनीने प्रत्येकी एक हजार रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ३०० कोटी रुपयांच्या (बेस इश्यू साइझ) व ४५० कोटी रुपयांपर्यंत ओव्हरसबस्क्राइब करण्याचा पर्याय असलेल्या एकूण ७५० कोटी रुपयांच्या व दोन हजार कोटी रुपयांच्या शेल्फ लिमिटच्या आतील (ट्रॅंच वन इश्यू) सिक्युअर्ड, रेटेड, नोंदणीकृत, रिडीमेबल, नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (सिक्युअर्ड एनसीडी) खुल्या विक्रीला २८ मेपासून सुरुवात करण्याचे जाहीर केले आहे.

हा इश्यू २० जून २०१८ रोजी बंद होणार असून, कंपनीचे संचालक मंडळ किंवा एनसीडी पब्लिक इश्यू कमिटीने यांनी घेतलेल्या निर्णयानुसार इश्यू लवकर बंद करण्याचा किंवा त्यास वाढीव मुदत देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

आयसीआरए व इंडिया रेटिंग्ज यांनी दिलेल्या रेटिंगमधून ‘अत्यंत सुरक्षितता’

सूचित ट्रँच वन इश्यू अंतर्गत विक्री करण्याचे प्रस्तावित असलेल्या सिक्युअर्ड एनसीडींना आयसीआरएकडून दोन हजार कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी आयसीआरएकडून २७ एप्रिल २०१८ रोजीच्या पत्राद्वारे (आयसीआरए) एए-स्टेबल असे रेटिंग देण्यात आले व नंतर ११ मे २०१८ रोजीच्या पत्राद्वारे हे रेटिंग पुन्हा अधोरेखित करण्यात आले आणि दोन हजार कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी इंडिया रेटिंग्जकडून २७ एप्रिल २०१८ रोजीच्या पत्राद्वारे आयएनडी एए-स्टेबल असे रेटिंग देण्यात आले व नंतर १० मे २०१८रोजीच्या पत्राद्वारे हे रेटिंग पुन्हा अधोरेखित करण्यात आले. आयसीआरए व इंडिया रेटिंग्ज यांनी सिक्युअर्ड एनसीडींना दिलेले रेटिंग आर्थिक आश्वासने व जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत अत्यंत सुरक्षितता दर्शवते.

जेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाश्वत बेलापूरकर म्हणाले, ‘जेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेडच्या एनसीडीची खुली विक्री ही जेएम फिनान्शिअल समूह या विश्वासार्ह व नामवंत ब्रँड असलेल्या प्रस्थापित वित्तीय सेवा समूहातर्फे पहिलीच विक्री आहे. आमच्या कंपनीने स्थिर व शाश्वत आर्थिक प्रगती केली आहे आणि ते उत्पन्न व नफा यामध्ये झालेल्या सातत्यपूर्ण वाढीतून, तसेच कॉन्झर्व्हेटिव्ह डेट् इक्विटी गुणोत्तरातून व मालमत्तेच्या उत्तम गुणवत्तेतून दिसून येते. आमच्या एकूण उत्पन्नामध्ये आर्थिक वर्ष २०१५पासून आर्थिक वर्ष २०१८पर्यंत वार्षिक १०९.९ टक्के वाढ झाली आणि करोत्तर नफ्यामध्ये आर्थिक वर्ष २०१५पासून आर्थिक वर्ष २०१८पर्यंत वार्षिक ८८.८ टक्के वाढ झाली. निधीसाठीचा खर्च कमी करण्यासाठी, तसेच अर्थपुरवठ्यामध्ये स्थिरता व रोखता राहण्यासाठी आम्हाला उपयोगी होईल, असे वैविध्यपूर्ण फंडिंग उपलब्ध करण्यासाठी एनसीडी इश्यू हे महत्त्वाचे पाऊल आहे.’

जेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेडविषयी :
ही कंपनी जेएम फिनान्शिअल समूहाचा भाग असलेली, सिस्टेमॅटिकली इम्पॉर्टंट नॉन-डिपॉझिट टेकिंग नॉन-बँकिंग फिनान्शिअल कंपनी आहे. ही होलसेल फायनान्स एनबीएफसी आहे आणि रिअल इस्टेट प्रकल्पाच्या विविध टप्प्यांमध्ये रिअल इस्टेट विकासासाठी अर्थसाह्य उपलब्ध करणे अशा निवासी प्रकल्पांसाठीच्या वित्तपुरवठ्याद्वारे रिअल इस्टेट डेव्हलपर्सना एकात्मिक वित्तीय सेवा देते. कंपनीने सन २०१४मध्ये रिअल इस्टेट डेव्हलपर्सना कर्जे देण्यास सुरुवात केली आणि कंपनीचे ग्राहक मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, एनसीआर व कोलकाता येथे आहेत. कंपनी रिअल इस्टेट डेव्हलपर्सना सिक्युअर्ड व अनसिक्युर्ड कर्जपुरवठा करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये प्रोजेक्ट फायनान्स, मालमत्तेवर कर्जे, शेअर्सवर कर्जे, प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी कर्जे आणि जमिनीवर कर्जे समाविष्ट आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link